नवी मुंबईत ८५ टक्के नालेसफाई पूर्ण
नवी मुंबई : १३ मे रोजी सायंकाळी आकस्मिक वादळ आणि पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेत अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांना नैसर्गिक नालेसफाईच्या कामांची पाहणी करुन त्यांना गती देण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरु असलेल्या नमुंमपा क्षेत्रातील ७७ लहान-मोठ्या नैसर्गिक नाल्यांची सफाई तसेच अभियांत्रिकी विभागामार्फत सुरु असलेल्या ४ मोठ्या नाल्यांची सफाई यांचा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि शहर अभियंता संजय देसाई यांनी आढावा घेतला असता सरासरी ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित नालेसफाई तत्परतेने पूर्ण करुन साफसफाई पूर्णत्वाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
नाल्यांमधून काढून काठावर ठेवण्यात येणारा गाळ काहीसा सुकल्यानंतर लगेचच तिथून हलवावा आणि या कामात हलगर्जीपणा करु नये, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे सफाई करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधने पुरवावीत आणि त्यांचा वापर कामगारांकडून केला जात असल्याची खातरजमा करावी, असे पाहणीवेळी अतिरिवत आयुवत सुनिल पवार यांनी निर्देशित व्ोÀले.
सीबीडी, सेवटर-१२ येथील पंपहाऊसची पाहणी केल्यानंतर तेथे सुरु असलेली पंपहाऊसची कामे तसेच विद्युत कामे त्वरित पूर्ण करुन घ्यावीत. सायन-पनवेल हायवे खालून हर्डिलिया कंपनी जवळील लक्ष्मीवाडी नजिकचा मोठा नाला साफ करताना हायवेखाली छोट्या मशीनचा प्रभावी वापर करुन कामाला गती देण्याचे सूचित करण्यात आले. पारसिक हिल आणि रमाबाई आंबेडकर नगर येथील दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करुन त्या भागातील झोपड्या स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले. सीबीडी, सेवटर-५ आणि ६ या जमिनीच्या पातळीपासून खाली असणाऱ्या सखल भागात अतिवृष्टी आणि उधाण भरतीची वेळ जुळून आल्यास पाणी साठण्याची संभाव्यता लक्षात घेऊन तेथे पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपांची व्यवस्था करुन ठेवण्याचे सूचित करण्यात आले. सेवटर-३ आणि सेवटर-९ सीबीडी-बेलापूर येथील नालेसफाईचीही पाहणी करुन सदर कामे गतीमानतेने पूर्ण करावीत, असे निर्देशित करण्यात आले.