मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उष्णता लाट; शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी
नवी मुंबई ः सध्या राज्यभरात उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. शाळेला सदर बाब माहिती असताना देखील अशा वातावरणात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्या जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे? इतक्या उन्हात शाळा सुरु ठेवणे म्हणजे धोकादायक आहे. त्याअनुषंगाने काही पालकांच्या तक्रार वजा विनंतीनुसार ‘आप-नवी मुंबई'च्या वतीने नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाला पत्र देऊन शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘आप-नवी मुंबई'तर्फे महापालिका मुख्यालयामध्ये महापालिका शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना पत्र देण्यात आले आहे. या उन्हाळी हंगामामध्ये कडक उन्हामुळे शाळा दुपारपर्यंत सुरु न ठेवता खाजगी शाळांनी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत शाळा सुरु ठेवावी. किंवा जास्त तापमान असल्यास लहान बालकांच्या शाळेला सुट्टी द्यावी, अशी मागणी ‘आप'ने सदर पत्रातून महापालिका शिक्षण विभागाकडे केली आहे.
याप्रसंगी ‘आप'चे माजी नवी मुंबई शहर अध्यक्ष श्यामभाऊ कदम, नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, युवा अध्यक्ष महेश क्षीरसागर, बेलापूर विधानसभा अध्यक्ष प्रा. डॉ. विलास उजगरे, बेलापूर महिला अध्यक्ष स्नेहा उजगरे, नेरुळ अध्यक्ष जावेद सय्यद तसेच इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते