मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
२१ अनधिकृत झोपड्या निष्कासित
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाद्वारे दारावे आणि नेरुळ मधील एकूण २१ अनधिकृत झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ.राहूल गेठे यांच्या आदेशान्वये आणि सहाय्यक आयुक्त तथा बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली तसेच प्रशासकिय अधिकारी रमेश राठोड, कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार, वरिष्ठ लिपिक/करनिरिक्षक स्वप्निल तारमळे, लिपिक धिरेन भोईर, नयन भोईर यांच्या उपस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई ५ जानेवारी रोजी करण्यात आली.
या कारवाईत दारावे सेवटर-२३ मधील रेल्वे पटरी लगतच्या पदपथावरील आणि नेरुळ सेवटर-२७ मधील लोटस तलाव लगत असलेल्या एकूण २१ अनधिकृत झोपडयांवर निष्कासित करण्यात आल्या आहेत. स्वतःहून हटविने आवश्यक होते.
अनधिकृत झोपड्यांविरुध्द महापालिका अे विभाग बेलापूर कार्यालय मार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत. या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील अधिकारी-कर्मचारी, १० मजूर १ जेसिबी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस यांचे सहाय्य घेण्यात आले.
दरम्यान, यापुढे देखील अतिक्रमण विरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहूल गेठे यांनी स्पष्ट केले.