वाशी गांव, पामबीच-सानपाडा येथे ‘गांव चलो अभियान'

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, ‘भारतीय जनता पक्ष'चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तसेच नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबईतील प्रत्येक गावात आणि प्रभागामध्ये ‘गांव चलो अभियान' असा जनजागृती, संवाद आणि आशीर्वादपर उपक्रम थेट जनतेत जाऊन राबविण्यात येत आहे.

त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी वाशीगांव येथे ‘अंत्योदय संकल्पना'चे प्रणेते पं. दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्मृतिदिन प्रित्यर्थ त्यांच्या प्रतिमेचे पुजन आणि पुष्पाजंली अर्पण करुन ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांच्या उपस्थितीत ‘गांव चलो अभियान' राबविण्यात आले. वाशी ग्रामस्थ तसेच प्रभाग क्र.७७ आणि ७८ पामबीच-सानपाडा मधील रहिवाशांशी तसेच परिसरातील व्यापारी, लहान-मोठे दुकानदार आणि फेरीवाले यांना ‘गांव चलो अभियान' उपक्रमाच्या पुस्तिकांचे वाटप करुन त्यातील उल्लेखीत विविध लोकोपयोगी योजनांबाबत चर्चेद्वारे संवाद साधण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या १० वर्षाच्या कार्यकाळात देशातील जेष्ठ, महिला, युवा वर्ग, सर्व घटकांतील जनतेला प्रादेशिक आणि  भौगोलिक दृष्ट्या समतोल साधून विविध जनकल्याणाच्या योजनांद्वारे प्रत्यक्ष लाभ मिळवून दिलेला आहे.

वाशी गांव येथील ‘गांव चलो अभियान'मध्ये नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जो विश्वास गेली १० वर्षे अटलपणे ठेवला आहे, तोच विश्वास यापुढेही ठेवण्याचे आवाहन केले. तसेच केंद्रीय, राज्य सरकारच्या तसेच महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन आणि लाभ मिळवून देण्याकरिता कटीबध्द असल्याचे त्यांनी ग्रामस्थ, मच्छीमार बांधव-भगिनी, रहिवाशी, खेळाडू, पोलीस बांधवांचे कुटुंबीय, व्यापारी दुकानदार आणि फेरीवाले यांना सांगितले.

याप्रसंगी ‘भाजपा उत्तर भारतीय मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष राजेश राय, ‘गांव चलो अभियान'चे नवी मुंबई प्रमुख सुरेश गायकवाड, माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत, माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत, युवा नेता निशांत भगत, संदीप भगत, समाजसेवक भाऊ भापकर, सानपाडा मंडल अध्यक्ष वैभव भास्कर, सरचिटणीस हितेंद्र जैन, जेष्ठ ग्रामस्थ सुर्यकांत भोईर, शक्ती केंद्र प्रमुख हरिश्चंद्र सुतार, बुथ अध्यक्ष सुधाकर भोईर, सुरेश म्हात्रे, किरण सुतार, निरज पाटील, रोहित खंडागळे, तुषार पाटील, मंगेश म्हात्रे, युनूस फरास, निखिल खाडे, आशिष घरत, आदि सहभागी झाले होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

चिरनेर येथे श्री जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा