योग्य वेतन द्या, नाही तर आंदोलन!

पनवेल :अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्त कामगारांना योग्य वेतन द्यावे, अन्यथा अमेटी युनिव्हर्सिटीविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा आमदार महेश बालदी यांनी घेतला आहे. 

या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी अमेटी युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, तालुक्यातील अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये साधारण १०० प्रकल्पग्रस्त कामगार विविध विभागामध्ये कार्यरत आहेत. आणि या अस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतना पेक्षा कमी पगार दिला जात आहे. असे माझ्या निदर्शनास आले असून मध्यंतरीच्या काळात सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त पनवेल यांच्याकडे या संदर्भात दावा दाखल केला होता, मात्र अमेटी युनिव्हर्सिटीच्या संबंधित व्यवस्थापन उडवा उडवी ची उत्तरे देऊन वेळ काढू पणाची भूमिका घेत आहे. हि भूमिका कामगारांवर अन्याय करणारी आहे, त्यामुळे कामगारांवर अन्याय दूर करण्यासाठी सबंधित पत्राची दखल घेऊन कामगारांच्या वेतन संबंधित बैठकीचे आयोजन करून स्थानिक कामगारांना न्याय द्यावा अन्यथा अमेटी युनिव्हर्सिटी व्यवस्थापना विरुद्ध आंदोलन छेडले जाईल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामास अमेटी युनिव्हर्सिटी व्यवस्थापक पूर्णपणे जबाबदार राहतील, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये मलमिश्रित पाणी रस्त्यावर