उल्हासनगर महापालिकेचा डेटा बेस तयार करण्याचे काम अंतिम टप्यात

उल्हासनगर : आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिकेने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर, नागपूर सोबत सामंजस्य करार केला असून त्याप्रमाणे जवळपास ८० टवव्ोÀ डेटा बेसचे काम पूर्ण केले आहे. यामुळे अनधिकृत बांधकाम नियमित करताना ते बांधकाम २००५ पूर्वीचे आहे किंवा नाही ते निश्चित करणे सोईचे होईल.

शहरामध्ये विकास रस्ते (डीपी रोड) बांधकाम सुरु आहे. त्यामध्ये ७ नुसार त्याचे माकर्िंग करणे, शिवाय एखाद्या ठिकाणी इमारतीचे, जागेचे नेमके किती क्षेत्र  डीपी रोडने बाधित होत आहे, ते सुध्दा निश्चित करणे शक्य होईल. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याचाही कटाक्ष राखला जाईल, अशी सर्व अचूकता असलेले ड्रोन प्रतिमाद्वारे तयार केलेल्या जीआयएस डेटावरुन ठरविणे शक्य होईल. विविध कालावधीत कलेल्या जसे वर्ष (२००५, २००८, २०१२, २०१७, २०२२, २०२४) उपग्रहाचे छायाचित्रांद्वारे जीआयएस डेटा तयार करुन विविध विकास कामांचे नियंत्रण करण्यात येईल.

त्याअनुषंगाने १३ मे रोजी डॉ. आनंद शाक्य आणि त्यांच्या टिमने झालेल्या कामाचे सादरीकरण आयुक्त अजीज शेख यांच्यासमोर महापालिका स्थायी समिती सभागृहात केले. महापालिका क्षेत्राकरिता तयार करण्यात आलेल्या विकास योजनामध्ये नगर भूमापन विभागाचा सर्व टिका शिट, सिटी सर्वे नंबर, बरेक नंबर, रुम नंबर अंतर्भुत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासोबतच पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, कर, नगररचना, सार्वजनिक आरोग्य विभाग अशा जवळपास सर्वच विभागाचा अद्ययावत डेटा तात्काळ देण्याबाबत विभाग प्रमुखांना आयुक्त शेख यांनी निर्देश दिले आहेत. जेणेकरुन शक्य तितक्या लवकर सदर डेटाबेस नुसार सर्व विभागांना काम करणे सोईचे होईल.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर, नागपूर राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिनस्त असलेली संस्था आहे. काही नागरिकांना सदर संस्था खाजगी असल्याच्या शंका-कुशंका निर्माण होऊ शकतात. परंतु, सदर संस्था शासकीय असल्यामुळे त्यांनी तयार केलेली माहिती शासन मान्य आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाशी करार करुनच विविध विकास योजनांचे काम केलेले आहे. या संस्थेने कमी वेळेत जास्तीत जास्त काम पूर्ण कले असल्याने आयुक्त अजीज शेख यांनी डॉ. ए. के. जोशी यांचे विशेष अभिनंदन कले.

सदर कामाच्या सादरीकरण प्रसंगी उपआयुक्त किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, सहा. संचालक डॉ ललित खोब्रागडे, सहा. आयुक्त गणेश शिपी, दत्तात्रय जाधव, अनिल खतुरानी, मनिष हिवरे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, मालमत्ता व्यवस्थापक अलका पवार, भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, कर निर्धारक-संकलक जेठानंद करमचंदानी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटरचे प्रतिनिधी तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत ८५ टक्के नालेसफाई पूर्ण