चला गप्पा मारू या  

चला गप्पा मारू या   - शुभांगी पासेबंद. 

मला सगळे समजते हा अहंकार सोडून गप्पात उतरावे. आधी पाय बुडवावे, मग बघत उतरावे. ओघात विविध विषयांवर समृद्ध चर्चा होवु शकते. रुटीन तर असते, त्यात गप्पांचा मसाला टाकला की  मजा येते. चला गप्पांना, असे बोलावणे करतात. असे म्हणतात..गप्पा मारणे, चौकशी करणे, गॉसिप करणं यामुळे मनावरचा ताण कमी होतो.

चला गप्पा मारू या! असं आवडतं वाक्य असते. ते न बोलता सुद्धा माणसांना सतत गप्पा मारायला खूप आवडतं. गप्प न बसणे गप्प अधिक अ ृ गप्पा असा शब्द निर्माण झाला असावा. बायका फार बडबड करतात, अशी तक्रार केली जाते पण पुरुषांनासुद्धा गप्पा मारायला आवडते. सहलीच्या ठिकाणी, चांदण्या रात्री, उघड्या आकाशात हे सोबतच्या, बाजूला बसलेल्याशी, प्रवासात वाटसरू सोबत, मित्रांसोबत परिचितांशी, घरात बाहेर कुणा न कुणा सोबत, समोरच्याशी माणूस कायमच गप्पा मारत असतो.

गप्पा मारणे हा जणू काही माणसाचा एक मूलभूत हक्क असतो. गप्पांना काही खास विषय असावा लागतो असेही नाही. कोणताही विषय चालतो. हवा पाणी, पाहिजे ते, नातेसंबंध, राजकारण, महागाई कोणत्याही विषयावरगप्पा मारता येतात. गप्पा मारायला दोन व्यक्ती कमीत कमी लागतात. एक बोलणारा एक ऐकणारा हवा. पण याहून अधिक व्यक्ती, कुशल गोष्टीवेल्हाळ व्यक्ती असल्या तरीही चालतं. गप्पा मारण्यासाठी चहा-कॉफी, अन्य कुठली पेय, शीतपेय, कटिंग चहा, एकच प्याला, चकणा अथवा नाष्टा चहा-बिस्कीट काहीही चालतं. खाऊ किंवा विषय मग काहीही नसलं तरी माणूस गप्पा मारू शकतो. गप्पा मारुन पोट भरत नाही असे नेहमी बोलले जाते. त्यात असा अर्थ असतो की गप्पांच्या सोबत काहीतरी नाश्ता खायला आणि एखादे पेय प्यायला मिळावे. मोबाईलची सोय झाल्यामुळे मित्राकडे जाऊन मैत्रिणीकडे लांबवर जाऊन गप्पा मारायची गरज राहिली नाही. मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉलवर, काही बोलता येते. फोनवर व्हाट्‌सअपवर गप्पाच गप्पा मारता येतात.

गप्पिष्ठ बोलत राहतात. तोंडाची टकळी चालते. ल्हत्ग्स्ग्ूा्‌ म्ीत्त्े! खूप गप्पा मारायला, खूप माणसं असूनही कधीकधी माणूस मनातून एकटादेखील असू शकतो. सैरभैर, विस्कटलेले, एकटे. अशावेळी ही व्यक्ती स्वतःच्या मनाशी गप्पा मारु शकते. तुका म्हणे होय स्वतःचाच संवाद स्वतःशी. अशा स्वतःशी गप्पा मारल्या की आपल्या चुका समजतात. त्या सुधारण्याची संधी मिळते. गप्पा मारणे म्हणजे वायफळ गप्पा मारत वेळ घालवणे असे असतेच असे नाही. समोर ंत्ग्ह्‌ ंात्गनीे असु शकतात किंवा वैयक्तिक वैचारिक गप्पा शिकवण देतात. बोलले की बरे वाटते. ठरवले होते त्या व्यतिरिक्त निराळे, लिहीलेले, वाचलेले गप्पात येते.

गप्पात औपचारिक बोलणे व्यर्थ असते असं नाही. ओळख, गोडी, कला, हवा या पलिकडे गप्पांना काही विषय पण असू शकतात. गप्पांत काही वेचायचे असते. मला सगळे समजते हा अहंकार सोडून गप्पात उतरावे. आधी पाय बुडवावे, मग बघत उतरावे. ओघात विविध विषयांवर समृद्ध चर्चा होवु शकते. रुटीन तर असते, त्यात गप्पांचा मसाला टाकला की  मजा येते. चला गप्पांना, असे बोलावणे करतात. असे म्हणतात..गप्पा मारणे, चौकशी करणे, गॉसिप करणं यामुळे मनावरचा ताण कमी होतो. बोलून गप्पा मारणे अशक्य आहे म्हणून आज लिहून गप्पा मारल्या.
 -शुभांगी पासेबंद. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दिंडी साहित्याची