पंचनामा : राजाची सद्‌सद्‌विवेकबुद्धी कधी जागी होणार ?

राजाची सद्‌सद्‌विवेकबुद्धी कधी जागी होणार?
सामान्य माणूस असो की, मोठा राज्यकर्ता वा उच्च पदावर काम करणारा अधिकारी वा आमदार, खासदार, मंत्री यांनीही आपली सद्‌सद्‌विव्ोकबुद्धी सदैव जागी ठेवून वागले पाहिजे. पण सध्याच्या राजकारण्यांची सद्‌सद्‌विव्ोकबुद्धी काम करेनाशी झाल्याचे दिसून येत आहे. पंूजीपतीवाल्यांनी तर ती व्ोÀव्हाच आपल्या तिजोरीत बंद करÀन ठेवली आहे. ती त्यांच्या डोवयात येण्याची शवयता मुळीच नाही. तेव्हा आपणच योग्य वेळी जागे झाले पाहिजे.
आज आपण आधुनिक जीवन जगत आहोत, असे आपल्याला वाटते, पण, ते कितपत खरे आहे? भारतातील किंवा जगातील लोकही, आपापल्या पूर्वजांनी चालू व्ोÀलेल्या परंपराच पाळत आहोत. आपली विचारसरणी पांरपारिकच आहे. ईश्वर, धर्म, भाग्य, जाती, व्यवितगत, कौटुंबिक बाबतीत तेवढेच आपण कट्टर आहोत. जेवढे शंभर-दोनशे वर्षापूर्वी होतो. आधुनिक जीवनशैलीच्या तुलनेत आपल्या विचारात फारसा फरक पडलेला नाही.
शिक्षण, टेवनॉलॉजी किंवा ज्ञान विज्ञान यांच्या तुलनेत भारतीय माणसांची भावना किंवा आस्था आजही धर्म आणि जातीयवादावर अधिक आहे. आज आपण सर्वधर्म समभाव म्हणतो. पण प्रत्यक्षात तो पाळतो का? कायद्याने आंतरजातीय विवाहाला मान्यता दिलेली असतानाही आज कितीसे आंतरजातीय विवाह होतात? किंवा समाज त्यांना कितीसे प्रोत्साहन देतात? जर चुवूÀनमावूÀन एखादा विवाह झालाच तर, काही दिवसातच त्याचे घटस्फोटात परिवर्तन होते.
जुळवून व्ोÀलेल्या विवाहातही ‘हुंडा' प्रवृत्तीचा अभिशाप आहेच. शिकले-सवरलेले लोकही त्याचे शिकार आहेत. शैक्षणिक संस्था असोत की, स्वास्थ्य वेंÀद्र या व्यतिरिवत धर्मस्थळांना अधिक महत्त्व दिले जाते. देशाच्या राजनैतिक पाटर्या व सरकारे देखील लोकांची ही मनोवृत्ती जाणून, याच मुद्यावर आपले लक्ष वेंÀद्रीत करÀन त्याचाच हत्यार म्हणून वापर करताना दिसतात. त्याचाच परिणाम आपण देशात जागोजागी, राज्याराज्यात धार्मिक दंगली (जातीय) घडत आहेत. हीच धार्मिक भावना माणसाचे आर्थिक, सामाजिक, सांस्वृÀतिक एवढेच नाही, तर राजनैतिक कमजोरी ठरत आहे.
स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळात लोकांनी आपापल्या धर्मापेक्षा देशाला महत्त्वाचे स्थान दिले होते. पण, इंग्रजासह, धार्मिक नेत्यांनी जनतेच्या मनात विषाचे ‘बीज' पेरले व देशाचे दोन तुकडे झाले. याचाच धडा घ्ोऊन देशाच्या स्वातंत्र्यानंतर जी राज्यघटना लिहिली गेली त्यात नव्या भारतात जाती, धर्माला वगळून सर्वधर्म समभाव ही संकल्पना मांडण्यात आली व देशात लोकशाहीच्या कारभाराला महत्त्वाचे स्थान मिळाले. ही त्या काळच्या राज्यकर्त्यांची दूरदृष्टी म्हणावे लागेल. पण आज त्याच दूरदृष्टीचे वाटोळे करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. जात, पात, धर्म, सांप्रदायिकता यांचा प्रभाव वाढला आहे. त्याने नागरिकांचे मुलभूत अधिकारही हिरावून घ्ोतले जात आहेत.
एकीकडे भारताला ‘भारतमाता' म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे त्याच भारतमातेच्या पुत्रांना विभागण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. लोकशाहीची जागा तानाशाहीने घ्ोतली आहे. त्यातून जनतेला कमजोर आणि दुःखी करण्यात येत आहे.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे या काळात, जगभरातील अनेक देशात, मग ते विकसित असोत की, अविकसित असोत, तेथे हा ‘टें्रंड' चालू आहे. तेथील सरकारे नागरिकांच्या अधिकारावर हल्ला करत आहेत. त्यांच्या अधिकारात कपात करत आहेत. आणि सरकारे त्यांना (नागरिकांना) राष्ट्रवादाचे बाळकडू पाजत आहेत. हेच बाळकडू पिऊन ही सांप्रदायिक वाली मंडळी अशा तानाशाही सरकारच्या समर्थनार्थ उतरÀन स्वतःच्याच हाताने स्वतःच व्ौÀद होत आहेत. आणि त्याचा फायदा धनदांडगे उचलत आहेत. धनदांडगे आपला खेळ खेळत आहेत.
या धनदांडग्यांनी देशाची जवळपास सर्व संपत्ती आपल्या मुठभर लोकांच्या हातात घ्ोतली आहे. ते तर गर्भश्रीमंत झाले.. पण, भारत मात्र गरीब होत चालला आहे. आता असे मानले जात आहे की, हा देश काही मोजवयाच लोकांचा राहिला आहे किंवा बनला आहे.
गत काही वर्षात देशाच्या सर्व आस्थापना, कंपन्या, रेल्वे, विमान कंपन्या, तेल कंपन्या, विमा कंपन्या, एवढेच नव्हे, तर अनेक बँकाही या पंूजीपती लोकांच्या घशात घातल्या गेल्या आहेत. सैन्यात, पोलिसात कंत्राटी पद्धत लागू करण्याच्या योजना आहेत. शाळा, महाविद्यालयातही शिक्षकांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहेत.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने तेही शेती करण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांच्या जमिनीदेखील या पंूजीपती व्यवितच्या हाती व्ोÀव्हा जातील याचा नेम नाही. सरकार विरोधात एवढे बोलले जात असतांनाही सरकार जागे व्हायला तयार नाही. उलट जेवढे जमेल तेवढे धन या व्यवितंच्या पदरात पाडण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे, सरकारने एक नवीन विधेयक लोकसभेत आणले होते, त्यानुसार परदेशी संगणक, लॅपटॉप आयात करण्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव होता, त्याच जोडीला मुव्ोÀश अंबानी ग्रुपच्या संगणक व लॅपटॉपला मार्वेÀट मिळवून देण्याचा प्रस्ताव होता. त्यात जनतेला फसवण्याचाही मोठा प्रयत्न होता. त्यात म्हटले होते की, अंबानी ग्रुप लोकांना लॅपटॉप स्वस्त दरात देईल. मुव्ोÀश अंबानीनी सुरÀवातीला आपल्या कंपनीचे मोबाईल लोकांना सुरÀवातीला खुपच स्वस्त दरात दिले. पुढे त्याची किंमत वाढत जाऊन आज ती वुÀठल्या थराला गेली आहे. त्यांची चार्जिंग किंमतही आज वुÀठल्या वुÀठे गेली आहे. त्याच वेळी सेवा मात्र कमी करण्यात आली आहे. सांगायला तीन महिने सांगितले जातात, प्रत्यक्षात अंबानीचे तीन महिने ८४ दिवसाचेच असतात.
आज आपण स्वातंत्र्याची ७६ वर्ष पूर्ण करत आहोत, सरकार देशाचे अमृत वर्ष मानत आहे. स्वतंत्रता, समानता, अधिकार, धर्मनिरपेक्षता व बंधूत्व ही २१व्या शतकातील नागरिकांची आभूषणे आहेत. पण देशात सध्या विपरीत हवा पसरवली जात आहे. लोक त्या आभूषणांना अभिशाप समजू लागले आहेत. या देशात काहीही निष्पक्ष राहिलेले नाही. न्यायपालिका, वा कार्यपालिका या सर्वसामान्यांच्या आवावयाबाहेर गेलेल्या आहेत. ज्यांचे काम सरकार व जनतेत दुव्याचे काम करायचे असते ती ‘मिडिया' संस्थाही सरकारचे बाहुले बनली आहे. लोकांच्या मनाचा विचार करायला कोणालाच वेळ नाही. सरकार मग ते वेंÀद्राचे असो वा राज्याचे, त्यांनी फवत जनतेला गृहीत धरलेले आहे.
या बाबतीत उपदेश करताना संतांनी म्हटले आहे की, राज्यकर्त्यांची विवेक बुद्धी शाबूत असायला हवी. राज्यकर्ता निपूत्रीक नसावा, संन्याशी नसावा, वुÀविचारीही नसावा. तसा राज्यकर्ता कधीच आपले राज्य नीट सांभाळू शकणार नाही. या बाबतीत एक गोष्ट आठवली ती अशी.
...राजा रणजीतसिंग यांची. जगज्जेता होण्याची त्यांची इच्छा होती व तसा त्यांचा पराव्रÀमही होता. लहोरी जिंवूÀन ते आपल्या सेनेसह राज्यात परत येत असतांना एक जंगल लागले. जंगलात एक म्हातारी जमिनीवरील दगड उचलून समोरच्या बोराच्या झाडावर मारीत होती व बोरे पडल्यावर त्याचे ढीग करÀन ठेवीत होती. तिला राजेसाहेब जात असल्याची काहीच कल्पना नव्हती. तिचे दगड मारणे चालूच होते. तेवढ्यात तिने मारलेला एक दगड रणजीतसिंग यांच्या कपाळावर लागला आणि रवताची धार वाहू लागली. सैनिक सतर्क झाले व मारणाऱ्याचा शोध घ्ोऊ लागले. त्यांना दगड मारणारी म्हातारी दिसताच तिला पकडून त्यांनी महाराजासमोर उभे व्ोÀले. म्हातारीला परिस्थिती लक्षात आली. ती गयावया करÀन म्हणाली की, महाराज आपण इथे असल्याचे मला माहीत नव्हते. रोजच्याप्रमाणे मी बोरे गोळा करीत होते. रोज ही बोरे विवूÀन जे पैसे मिळतात त्यावर माझ्या वुÀटूंबाचे उदरभरण होते. मी आपल्याला जाणून बुजून नाही मारले. मला क्षमा करावी महाराज असे म्हणून तिने रणजीतसिंगाचे पाय धरले.
सेनापती व सेना आता म्हातारीला देहदंडाची शिक्षा महाराज देतील याची वाट बघत होते. रणजीतसिंगांना म्हातारीच्या परिस्थितीची जाणीव झाली. ते सेनापतीकडे वळून म्हणाले की, एक सोन्याच्या मोहरा भरलेली थैली घ्ोऊन या. थैली आल्यावर ती त्यांनी म्हातारीला दिली व तिला जाण्यास सांगितले.
सेनापती व सेनेला आश्चर्य वाटले न राहवून सेनापती महाराजांना म्हणाले की, महाराज, त्या म्हातारीला कठोर शिक्षा करायचे सोडून आपण तिला मोहरांचे इनाम का दिले महाराज?
त्यावर महाराज उत्तरले की, अरे दगड मारल्यावर ते बोराचे झाड जर गोड बोरे देते, तर रणजीतसिंगाने त्याहून काही कमी देणे शोभले असते का? आपल्या जीवनातसुद्धा असे प्रसंग अनेकदा येतात. त्यावेळी आपण आपली सद्‌सद्‌विव्ोकबुद्धी जागी ठेवून वागले पाहिजे.
तात्पर्य काय, सामान्य माणूस असो की, मोठा राज्यकर्ता वा उच्च पदावर काम करणारा अधिकारी वा आमदार, खासदार, मंत्री यांनीही आपली सद्‌सद्‌विव्ोकबुद्धी सदैव जागी ठेवून वागले पाहिजे. पण सध्याच्या राजकारण्यांची सद्‌सद्‌विव्ोकबुद्धी काम करेनाशी झाल्याचे दिसून येत आहे.
पंूजीपतीवाल्यांनी तर ती व्ोÀव्हाच आपल्या तिजोरीत बंद करÀन ठेवली आहे. ती त्यांच्या डोवयात येण्याची शवयता मुळीच नाही. तेव्हा आपणच योग्य वेळी जागे झाले पाहिजे.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी: शिकण्याचं वय