नवी मुंबई भाजपाच्यावतीने तिरंगा जागृती बाईक रॅली

तिरंगा बाईक रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

नवी मुंबई -:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर घर घर तिरंगा, हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार या अभियानाच्या जागृतीसाठी नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी भव्य जागृतीपर तिरंगा बाईक रॅली आयोजित केली होती. या बाईक रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन राष्ट्रप्रेमाचा भव्य आविष्कार घडवला.

 आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ,ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या बाईक-मोटार रॅलीमध्ये सहभागी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला. नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, खासकरून युवक आणि युवतीवर्ग ,ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.‌ प्रत्येकाने बाईकवर, गाड्यांवर अभिमानाने भारतीय तिरंगा धारण केला होता. भारत माता की जयचा जयघोष सुरू होता. देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारले होते. दिघा येथील तलावापासून दुपारी साडेचार वाजता

या भव्य बाईक रॅलीचा शुभारंभ झाला. आमदार गणेश नाईक आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नवी मुंबईतील विविध नोड आणि गाव गावठाणा मधून फिरून ही रॅली पुढे मार्गस्थ झाली.  वरूनराजानेही या रॅलीमध्ये जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसातही सहभागी नागरिकांचा जल्लोष, जोश आणि उत्साह कणभर ही कमी झाला नव्हता. उलट सर्व सहभागी देशभक्तीच्या भावनेने चिंब झाले होते. बेलापूर येथील महापालिका मुख्यालय परिसरात या भव्य तिरंगा बाईक रॅलीची सांगता झाली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'मध्ये पदयात्रा, वृक्षारोपण कार्यक्रम साजरा