‘सिडको'मध्ये पदयात्रा, वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

‘सिडको'त ‘घरोघरी तिरंगा अभियान'सह विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळामध्ये १३ ऑगस्ट २०२२ रोजी पदयात्रा आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील यांच्यासह ‘सिडको'तील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र देशभर मोठ्या उत्साहाने साजरा होत असून यानिमित्त ‘घरोघरी तिरंगा अभियान'सह अनेक विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको महामंडळातही व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निबंध आणि कविता लेखन स्पर्धा, पदयात्रा, फुटबॉल सामना, देशभक्तीपर गीते आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ ऑगस्ट रोजी ‘सिडको'चे मुख्यालय असलेल्या सिडको भवन ते रायगड भवन दरम्यान सकाळी ९ वाजता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता रायगड भवन समोरील मैदानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच संध्याकाळी ५ वाजता सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रदर्शनीय फुटबॉल सामन्याचेही आयोजन करण्यात आले होते. सदर सर्व कार्यक्रमांमध्ये ‘सिडको'तील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर्णकर्कश आवाज करणा-या दुचाकी वाहनावर नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाई