शिवसेना विरोधात बंड पुकारल्याने शिवसैनिकांमध्ये कमालीचा उद्रेक

नवी मुंबई :- नगरविकास मंत्री आणि पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विराेधात बंड करत आपला स्वत्रंत गट स्थापन करण्याचा मनसुबा आखला आहे. त्यामुळे  राज्यात आता कट्टर सैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक सामना रंगू लागला आहे आणि याचे पडसाद आता नवी मुंबईत देखील उमटले असून नेरूळ मधील माजी नगरसेवक तसेच शिवसेना उपशहरप्रमुख सतीशदादा रामाणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासले.

पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेना आमदारांना घेऊन शिवसेना विरोधात मोठे बंड पुकारले आहे आणि घडामोडींमुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उद्रेक निर्माण झाला असून सर्वच बंडखोरांप्रती उघडपणे संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत व श्रध्दास्थान असणाऱ्या उध्दव ठाकरेंना आजारपणात त्रास देणाऱ्या शिवसेना आमदारांप्रती शिवसैनिक राज्यभर वेगळ्या भाषेत उल्लेख करताना त्यांना वेगवेगळ्या उपाध्या देत आपला संताप व्यक्त करत शिवसैनिक अजून संपला नसल्याचे घोषणांतून सांगत आहेत.तर या बंडखोरांचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे विरोधात  मोठ्या प्रमाणात आपला संताप व्यक्त करू लागले आहेत.आणि याचे पडसाद आता नवी मुंबईत ही उमटले आहेत.नेरूळ मधील  माजी नगरसेवक तसेच शिवसेना उपशहरप्रमुख सतीश रामाणे यांनी शनिवारी  सकाळी शिवसेना शाखा क्रमांक ९६ वर असलेल्या फलकामधील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासून आपला संताप व्यक्त केला आहे . 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शेतकऱ्यांच्या थकीत पैशांच्या तक्रारीबाबत धोरण ठरविण्याची मागणी