शेतकऱ्यांच्या थकीत पैशांच्या तक्रारीबाबत धोरण ठरविण्याची मागणी
नवी मुंबई -:कृषी उत्पन्न बाजार आवारात शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना विकतात आणि त्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांना पैसे अदा करतात. मात्र बऱ्याच वेळी शेतकऱ्यांचे पैसे थकवले जातात आणि याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पैसे परत मिळावे म्हणून किती दिवसात तक्रार केली पाहिजे याठी निच्छित धोरण ठरविण्याची गरज असून संचालक मंडळाच्या बैठकीत यावर विचार करावा अशी मागणी कांदा बटाटा मार्के चे संचालक अशोक वाळुंज सभापती व एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध बाजार आवारातील व्यापारी नियमनाखालील शेतमालाचा व्यवसाय बाजार आवारात करीत असतात. बाजार आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री झाल्यानंतर शेतमालाचे पैसे अदा करण्यात येतात . अशाप्रकारे बाजार आवारात शेतीमालाची खरेदी विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांची रक्कम अदा केली जाते. अशाप्रकारच्या नेहमी होणाऱ्या व्यवहारामुळे बहुतांशी प्रकरणात व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये विश्वासाचे नाते तयार होते. त्यामुळे काही वेळा शेतकरी अथवा व्यापारी एकमेकांवर विश्वास ठेऊन व्यवहार करीत असतो . मात्र सद्यस्थितीत एपीएमसी बाजार समितोकडे शेतकऱ्यांचे पैसे थकवल्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत .यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे १०-१५ वर्षांपूर्वीच्या झालेल्या व्यवहाराची रक्कम मिळाली नसल्या बाबतची संख्या वाढत आहे. मात्र इतक्या जुन्या कालावधीचे तपशीलवार माहिती व्यापारी जतन करीत नाहीत अथवा असे झालेले व्यवहार वयोपरत्वे लक्षात रहात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार आवारात विक्री केलेल्या शेतीमालाची रक्कम न मिळाल्याबाबत किती दिवसात तक्रार केली पाहिजे याबाबत निश्चित असे धोरण ठरवण्याची गरज आहे. त्या दृष्टीकोनातून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठ हा विषय येत्या संचालक मंडळ सभेपुढे विचारार्थं सादर करावा अशी मागणी कांदा बटाटा मार्केट चे संचालक अशोक वाळुंज यांनी एपीएमसी चे सभापती अशोकराव डक व प्रशासनाकडे केली आहे .