अति पर्यटनाची माती

अति तेथे माती, हे लहानपणापासून ऐकतो. आपले पूर्वज, आई-वडील आपल्याला सांगत असतात. आपण पण तो अनुभव वारंवार घेत असतो. पण त्यातून आपण काही शिकतोच असं नाही. शेजाऱ्यांनी सरी घातली म्हणून आपण दोरी घालतो आणि सहल करतो. जिंदगी ना मिले दोबारा या चित्रपटापासून तर आयुष्याची सार्थकता पर्यटन करण्यात किंवा फॉरेन टूर करण्यात आहे असाच एक समज समाजात पसरला आहे. आपल्याही देशात आपण पर्यटनाचा अतिरेक करतो.

आज बऱ्याच देशांमध्ये ईटली वगैरे या ठिकाणी अति पर्यटनासाठी गावातले स्थानिक लोक विरोध करतात. कारण की हे पर्यटन एवढ अतिरेकी असतं की त्या स्थानिक राहणाऱ्या लोकांना, त्यांच्या बेतांवर पाणी फिरवणाऱ्या ट्रॅफिक जामला, त्यांच्या स्वतःच्या समस्यांना प्रदूषणाला पर्यावरणाला घातक अशा त्या लोकांनी सोडलेल्या वेस्ट म्हणजे कचऱ्याला तोंड द्यावं लागतं. जागृती करणारे लेख कोणी सतत छापतपण नाही, कारण बहुतेक पर्यटक संस्था आणि विक्रीवाली आउटलेट्‌स, टूर ऑपरेटर्स ,गाड्या भाड्याने देणारे, हेच लोक जाहिराती देऊन आर्थिकदृष्ट्या अर्थकारणाचा पाया ठरत, खर्च भरून निघण्यास मदत करत असतात. मला आठवते, कोकणात गणपतीला जायचं म्हणून माझा एक क्लार्क गेला होता. तो जाताना ट्रॅफिकमध्ये अडकला. जेमतेम गणपतीसाठी दोन तीन तास थांबू शकला आणि दुसऱ्या दिवशी त्याला परतयावं लागलं. इतका ट्रॅफिक त्याला लागला होता. थंड हवेच्या ठिकाणी जावं म्हणून माणसं जातात; पण तिथली हवा थंड राहिली आहे का? अनेक अशा जागा आहेत जिथलं पर्यावरण अतिशय घातक झाले आहे. रस्ता खचतो,तिथल्या लँंड्‌स स्लाईड होतात. वेळी यावेळी पाऊस पडतोय. कधी कधी भयानक गरम होतं. ज्या केरळला गॉडस ओन कंट्री म्हणतात, त्या केरळमध्ये यावर्षी पर्यटक धावत जायला तयार नाहीत कारण की अतिशय उन्हाळा आहे. छोटे छोटे रस्ते, जाम झालेला ट्रॅफिक, ड्रमचे आवाज, न आवडणारं खाणं, फूड पॉइजनिंग, पर्यटकांची केली जाणारी लूट हे घातक आहे. सगळीकडे माणसं माणसं होती. ही माणसं, तिथली माणसं, कुठे जायचं नव्हतं, पण जायची घाई करत होती आणि ट्रॅफिक जाम केला होता.

 सुट्ट्या आरामदायी नव्हत्याच. लांब लांबच्या लोकेशनला जायचं. भोज्याला शिवायचं आणखी फोटो काढून, पोट भरायचं ,तिकीट काढायचं आणि परत जायचं. कितीतरी सुंदर टेकड्या, कितीतरी तलाव याठिकाणी सूर्योदय सूर्यास्त बघायला लोक एवढी गर्दी करतात की विचारू नका. निसर्गाचा आवाज कुठे ऐकताच येत नाही. नुसताच केऑस गोंधळ!
फोटो आणि मारे थाट! फक्त आपण लोकांना सांगू शकतो दर विकेंडला आम्ही ट्रिप करतो. अमुकअमुक ठिकाणी गेलो, या वीकेंडला तिकडे गेलो, त्या वीकेंडला तिकडे गेलो. प्रत्येक जण हेच सांगतो. कारण झालेला त्रास सांगून त्यांना स्वतःला कमीपणा घ्यायचा नसतो. ग्रेट लाईफ आहे असं दाखवायचं असतं.

पर्यटनस्थळे ही पर्यटनाची की गर्दीची याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. पर्यटनाची ठिकाण नुसती गर्दीने भरली नाही तर कचऱ्यानेदेखील भरलेली आहेत. पूर्ण जग आज ओव्हर टुरिझम, पर्यटन आणि झालेल्या राक्षसी परिणामांशी युद्ध करत आहे. स्थानिक लोक तर ह्या आलेल्या पर्यटकांना कंटाळले आहेत. केवळ पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून या लोकांना सोसलं जात आहे. गोव्याची माणसं तर म्हणे पर्यटक आले की एक तर धंदा आला म्हणून खुश होतात, नाहीतर आता हे खूप कचरा करून जाणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार यामुळे नाराज होतात. आवाज, दारू, ड्रग्स, महिलांची असुरक्षितता या कारणाने पर्यटनाची भीतीच वाटते. वाहनांसाठी नियम ठराविक एवढीच वाहने त्यादिवशी सोडावी. कोकण रेल्वे मागे एवढी ओवर फुल झाली होती की विनारक्षित  लोकांकडून दंगा धोपा व्हायची वेळ आली होती. काहीजण गुदमरलेसुद्धा ! त्यामुळे केवळ माणसंच गुदमरतात असं नाही. या पर्यटकांच्या जागा, पर्यटन स्थळेसुद्धा गुदमरत आहेत. मागे पूर्वी एका साप्ताहिकामध्ये लेख आला होता; शिर्डीमधून साईबाबा गर्दीला कंटाळून निघून गेले असावे; कारण तेव्हा शिर्डीला शनिवार रविवार भयंकर गर्दी  व्हायची. पर्यटन स्थळ ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे.त्यामुळे लोकांना ते धंदे सोडायचे नाही आणि प्रशासनालादेखील ते सोडायचं नाही. पण ही पृथ्वीला ओरबाडून काढणारी हाव आहे. या लोभापायी तुम्ही पृथ्वीचेपण नुकसान करत आहात. लोकांचा पोट पाणी आहे, म्हणून लोक सोसतात. पण स्पेन, इटली, क्रोएशिया जिकडे ओव्हर टुरिझममुळे खूप त्रास झालाय. म्हणाल नुसतीच लिहिते आहे, त्याचा परिणाम काय, त्याचा उपाय काय? तर प्रत्येकाला पर्यटन हवे फक्त श्रीमंतांनी जायचं का ? नाही ! तसं काही नाही. सगळे जाऊ शकतात. प्रत्येक जण पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो. पण येणाऱ्या पर्यटकांची संख्या नंबर मय्राादित ठेवा. जास्तीत जास्त ईमारती पर्यटन स्थळी बांधून आणि पर्यटक येतात म्हणून झाडे कापून पार्किंगची जागा करून, हॉटेले बांधून पृथ्वीचा समतोल बिघडवू नका. आपण बघतोय किती तापमान वाढत आहे. तरीही लोकं विषबाधा करून झाडं मारतात. का? तर त्यांना गाड्या लावायला जागा नाही. त्यांच्या जाहिरातीचे प्रॉडक्ट दिसत नाही. फायदा म्हणून! झाडांशी वृक्षतोड करून असे क्रूरपणे वागू नका. झाडे जगवणे फार आवश्यक आहे. सिंगल रोज कॅन बी माय गार्डन ! दररोज, शनिवार रविवार उठून, पर्यटनाला गेलेच पाहिजे, असं काही नाही. मॉल तर ईतके भरलेले असतात की विचारू नका. शहरात जवळपास कुठे गाडी स्कूटर घेऊन जाणे पणं अवघड होऊन जातं. सणवार,  संस्कृतीचे कार्यक्रम यावेळी तुफान गर्दी होते. अजून एक मला समजत नाही, मोटरसायकल रॅली अन कार रॅली का काढतात ? चालत जायच्या रॅली काढा, म्हणजे पर्यटनाला तरी धोका होणार नाही.

इलेक्ट्रिक वेहिकल,साठी लागणारी इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी मुळातच पयुएल लागतच असतं. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल, इलेक्ट्रिकल एनर्जी इज नॉट ग्रीन एनर्जी ! आमच्या ऑफिसचे डॉक्टर लोकल ट्रेनमध्ये गुदमरून बेशुद्ध पडले होते. काल का परवापण वर्तमानपत्रात लोकल ट्रेनच्या गर्दीत, एक महिला बेशुद्ध पडल्याची बातमी होती. कारण की उष्णताही जास्त आहे आणि गर्दीमध्ये ऑक्सिजन मिळत नाही.

पूर्वीच्या काळचं वार्षिक देवदर्शन हे सुद्धा पर्यटनच असायचं. पण आता वार्षिक प्रवासावरून आपण सहा महिन्यात जायला लागलो. नंतर तीन महिन्यात जायला लागलो. त्यानंतर पर्यटनाला महिन्यात एकदा जायला लागलो आणि आता दर विकेंडला जायला लागलो आहोत.

यात्रा आणि पर्यटन या दोन्हीतील सीमारेषा देखील अस्पष्ट झाली आहे. पूर्वी जीवनात एकदाच यात्रा करायचे. गया बद्री काया सुद्रार्ी असं बद्रीनाथ यात्रेबद्दल म्हटलं जायचं. आता बऱ्याच सुविधा झाल्या. रस्ते, दिवे, हॉटेल, वाहतूक व्यवस्थित झाली आहे. डोली वगैरेची सोय झाली. काही ठिकाणी हेलिकॉप्टरची सोय झाली. त्यामुळे पर्यटन वाढलं. त्याच्यात वाईट काहीच नाही. या सोयीचे मुळे सर्व लोकांना पर्यटनाचाआनंद घेता यायला लागला. पण हा पर्यटनाचा अतिरेक टाळायला हवा.

विमानतळावर सुद्धा बस स्टँड वर आल्यासारखी गर्दी असते. पुढचा मुद्दा कदाचित तुम्हाला असंबध्द वाटेल, पण वाढत्या लोकसंख्येला आणि शहरांमध्ये येणाऱ्या बाहेरील गर्दीलादेखील कुठेतरी चाप बसवायला हवा. ग्रामीण भागात विकास करायला हवा. मुंबईवरचा ताण कमी करायला हवा. पर्यटन वाढत राहिले तर तिसरी मुंबई काय दहावी मुंबई बांधली तरी मुंबईची गर्दी कमी होणार नाही. तर आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे.

बऱ्याच जणांना असं वाटतं की वाईट काही घडलं Landslide etc ते इतरांचे घडेल आमचं घडणार नाही. कारण आम्ही श्रीमंत आहोत. आम्ही परदेशी जाऊ शकू. आम्ही आमच्या घरी सुरक्षित राहू. बाहेर गर्मी वाढली तरी आमच्या घरात फुल एसी राहील. आमच्याकडे चांगले चांगले चार-चार इन्वर्टर आहेत. त्यामुळे वीज कपातीचा फरक पडणार नाही. पण सामाजिक बांधिलकी काहीतरी आहे. स्वार्थ अती झाला तरी माती होते. अति पर्यटनापासून सावध राहा! - शुभांगी पासेबंद 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 स्मार्टफोन, समाजमाध्यमे निकोप कुटुंब व्यवस्थेच्या मूळावर?