सण अक्षय तृतीयेचा अंतरी समर्पण भाव जागृतीचा

 वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. मुळात अक्षय शब्दाचा अर्थच कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या दिवशी नरनारायण परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे. म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो.

सण अक्षय तृतीयेचा अंतरी समर्पण भाव जागृतेचा. म्हणजे या दिवशी असा संकल्प करावा की तो कधीही मोडला जाणार नाही. चला तर मग पाहु या कोणता संकल्प करता येण्यासारखा आहे !  असेच एका संध्याकाळी जेवण्याची वेळ आणि कलर्स मराठी वर इंद्रायणी मालिका बघत असताना त्यातील एक प्रसंग आवडला, मनाला भावला. त्या मालिकेत विठुरायाचे मंदिर दाखवलंय आणि त्या मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरीला जात असतात आणि छोटीशी इंद्रायणी कोण चोरी करतो हे सगळ्या गावाला सांगते आणि चोरी करणारा चोर सापडतो. हा सगळा गोंधळ संपुष्टात आल्यानंतर मंदिरातील विश्वस्त या दानपेटीचे नाव बदलून समर्पण पेटी असा ठेवतात. ती पेटी रंगवत असताना छोटीशी इंद्रायणी विचारते समर्पण म्हणजे काय? त्यावर त्यावर छोट्याशा मुलीला दिलेलं उत्तर आवडलं. आपण दान कोणाला देतो? तर ज्याच्याकडे जी वस्तू नसते आणि ती आपल्याकडे असते तेव्हा आपण दान देतो. पण देवाजवळ सगळंच आहे. उलट तोच आपल्याला देत असतो. म्हणून दानपेटी ऐवजी समर्पण पेटी. म्हणजे आपल्याकडे असलेल्या वस्तूचा आपल्याला गर्व न व्हावा ते देवाला समर्पित करावे; मग ते समर्पण पैशाचे, भक्तीचेे कशाचे असावे ते आपण ठरवून देवापुढे समर्पित करावं म्हणून दानपेटी ऐवजी समर्पण पेटी. हा समर्पणाचा भाव फक्त देवापुरता किंवा दान-धर्म एवढा पुरता मय्राादित न राहता देशभक्ती, देश कार्य याकरता समर्पित केला तर जीवनाची सार्थकता होते. कारण जीवन प्रत्येक जण आपल्या पद्धतीने जगत असतोच असं म्हटलं जातं. परंतु जगावे परी किर्तीरूपी उरावे मग ते कोणतही चांगलं कार्य करून जगायला हवं.

मलाही एखाद्या संस्थेशी जोडले जावे आणि त्या संस्थेशी निगडित होऊन समर्पणाने कार्य करावे असे वाटते. समर्पण म्हणजे खरंतर तुमची सकारात्मकता अर्पण करणे. तुमची नकारात्मक नाही. तुमचा तुम्ही तुमचा आशा आशावाद आनंद देवाला अर्पण करावा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आनंद देऊन आपणही आनंद मिळवा. अक्षतृतीयेच्या शुभमुहूर्तावरती दान देण्याचे प्रथा प्रचलित आहे. बरेच लोक अन्नदान, कपडा दान करत असतात. आपण नेत्रदान, अवयव दान याचा विचार करू शकतो. त्याचबरोबर असं सामाजिक कार्य हातात घ्यावं की आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्या कार्याचा अवलंब करावा, ध्येयवेडे व्हावे तीच खरी अक्षय तृतीया...

 कधीच क्षय न पावेल असे कार्य करावे आणि मनातील समर्पण भाव उत्तेजित करावा.
तन समर्पित..मन समर्पित..धन समर्पित....
-सौ.आरती राजेश धम्रााधिकारी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी