इमारत बांधकाम उंचीची मर्यादा लवकरच 150 मीटर होणार

नवी मुंबई - येथील इमारत बांधकामाच्या उंचीची मर्यादा वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई येथील इमारत बांधकामाच्या उंचीचे मर्यादा आजमितीस 55 मीटर इतकी आहे. राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या इमारतीसाठी शासनाने त्यांच्या मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटीला नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी प्लॉट दिलेला आहे. मात्र, इमारत उंचीच्या मर्यादेमुळे बांधकाम रखडलेले आहे. मातोश्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे सर्वेसर्वा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजीवकुमार यांची भेट घेतली. यावेळी बोलताना संजीव कुमार यांनी नवी मुंबई येथील इमारत बांधकामाची मर्यादा लवकरच 55 मीटर वरून दिडशे मीटर पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे.
       

   राज्यातील काही आमदार आणि खासदारांनी मातोश्री को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीची स्थापना केली केलेली आहे.आमदार आणि खासदार या लोकप्रतिनिधींना मुंबई मंत्रालयात जाणे -येणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांना शासनाने नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर बारा मधील प्लॉट नंबर सहा दिलेला आहे. मातोश्री हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सदस्यांनी या पोटी लागणारे सर्व रक्कम भरलेली असून इमारत बांधकामाच्या उंचीवरून इमारतीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले आहे.नवी मुंबई येथील इमारत
बांधकामाच्या उंचीची मर्यादा वाढवावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध पक्षांचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत .मात्र, आजमितीपर्यंत इमारत बांधकाम उंचीच्या मर्यादेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
     

 इमारत बांधकाम उंचीच्या मर्यादामुळेच मातोश्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा बांधकामाचा विषय प्रलंबित आहे. यातूनच खासदार हेमंत गोडसे यांनी आज एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजीव कुमार यांची भेट घेतली. नवी मुंबई हे प्रगत शहर असल्याने राज्यासह देश-विदेशातील लोकांसाठी नवी मुंबई हे एक आकर्षण ठरत आहे. दिवसेंदिवस या शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढणार असून इमारत उंचीच्या मर्यादामुळे आमच्या मातोश्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे कामही गेल्या अनेक
महिन्यांपासून रेंगाळलेले असल्याचे खासदार गोडसे यांनी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजीव कुमार यांच्याकडे स्पष्ट केले होते.आपली मागणी न्यायिक असून इमारत बांधकाम उंचीची मर्यादा वाढविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि सिडको प्रशासन प्रयत्नशील असल्याचे संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.


आजमितीस नवी मुंबईतील इमारत बांधकाम उंचीची मर्यादा 55 मीटर असून लवकरच उंचीची मर्यादा 150 मीटर पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे ग्वाही खासदार
गोडसे यांच्याशी बोलताना संजीव कुमार यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

झाडांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यास महापालिका प्रशासनास अनेक अडचणी