सिध्दार्थ बांठिया यांनी ‘काँग्रेस'चा हात सोडून ‘भाजपा'चे कमळ घेतले हातात

 पनवेल मध्ये ‘काँग्रेस'ला झटका

 पनवेल ः पनवेल शहरामध्ये ‘काँग्रेस'ला मोठा झटका बसला आहे. ‘युवक काँग्रेस'चे माजी प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक सिध्दार्थ बांठिया यांनी ‘काँग्रेस'चा हात सोडून ‘भाजपा'चे कमळ हातात घ्ोतले आहे. भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन सिध्दार्थ बंठिया यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. दादर येथील भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे झालेल्या सदर पक्षप्रवेश प्रसंगी ‘भाजपा'चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदि उपस्थित होते. यावेळी ‘भाजपा'चे पनवेल शहराध्यक्ष माजी नगरसेवक जयंत पगडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, हरेश केणी, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका चारुशीला घरत, शहर खजिनदार संजय जैन यांच्यासह कपिल बोरा, निखिल मुनोथ, देवेंद्र अचलिया, भावीन जैन आदिंसह सिध्दार्थ बांठिया यांचे समर्थक उपस्थित होते.

तीन दिवसापूर्वी ‘काँग्रेस'चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पनवेल मध्ये मेळावा घेतला होता. त्यामुळे ‘काँग्रेस'ला ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी ‘काँग्रेस'ला ऊर्जा मिळण्याऐवजी सिध्दार्थ बांठिया यांच्या रुपाने मोठा हादरा मिळाला आहे. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

मुख्य लेखा-वित्त अधिकारी धनराज गरड यांना महापालिका तर्फे शुभेच्छा