पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

नवी मुंबई ः महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात ‘नवी मुंबई इंटक’चे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कर्मचारी प्रतिनिधींसमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घतली. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांचे गांभीर्य, कामगारांना होणारा त्रास, समस्या सोडविण्याबाबत प्रशासनाची उदसिनता कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत त्यांना निवेदन सादर केले.
दरम्यान, कामगारांच्या समस्यांवर लवकरात लवकर मार्ग काढून त्यांना दिलासा देण्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्याचे रवींद्र सावंत यांनी सांगितले.

कामगार नेते रवींद्र सावंत यांनी प्रत्येक आस्थापनेतील कर्मचारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत ६ जानेवारी रोजी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घतली. यावेळी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये स्वच्छता निरीक्षक-स्वच्छता अधिकारी संवर्गास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, पदोन्नत झालेल्या उपस्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता अधिकाऱ्यांना पदस्थापना, उप स्वच्छता निरीक्षक पदासाठी सेवाप्रवेश नियमावलीत १०० टक्के पदोन्नतीचे पद असा बदल करण्यात यावा, प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती, अधीक्षक-वसुली अधिकारी यांना प्रलंबित वेतनश्रेणी आणि वार्षिक वेतनवाढ, नमुंमपा कर्मचाऱ्यांतील उपआयुक्त संवर्गातील रिक्त ३ पदांवर पदोन्नती अथवा नामनिर्देशन अथवा कार्यभाराने नियुक्ती, नमुमपा अधिकाऱ्यांतून नियुक्त करावयाच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर नमुंमपा अधिकाऱ्यांची पदोन्नती, नामनिर्देशन अथवा कार्यभाराने नियुक्ती, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी-अपघात वैद्यकीय अधिकारी-कक्षसेवक-एएनएम-वर्ग ३ तथा वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, कर्मचारी-अधिकारी यांच्या निकत्तीवेतनाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा, अशा मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती सदर निवेदनाद्वारे आयुक्तांना करण्यात आली आहे.

तसेच सेवापुस्तके अद्यावत करण्यासाठी अनुभवी अथवा सेवानिवृत्त कर्मचारी यांची नेमणूक, ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा सुविधा, विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्याच्या सेवाप्रवेश नियमावलीत उचित बदल, ठोक मानधनावर कार्यरत तसेच नमुंमपा आणि परिवहन विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करणे, सेक्टर-११ कोपरखैरणे येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सुविधा, शिक्षण विभागातील कार्यरत बहुउद्देशिय कंत्राटी कामगार (सुरक्षा रक्षकांच्या) विविध समस्यांची सोडवणूक, परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांना २०१५ पासून ३३ महिन्यांच्या थकबाकीची पूर्तता आणि त्यांचा प्रलंबित असलेला एप्रिल २०२१ चा बोनस, याबाबतही निवेदनातून महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

याशिवाय कर्मचाऱ्यांना विमा, पीएफची पावती मिळणे, कोव्हीड भत्ता, बायोमेट्रीक हजेरी, सातवा वेतन आयोग, व्ॉÀशलेस विमा पॉलिसी, आदिंबाबतही सदर निवेदनातून आयुक्तांकडे दाद मागण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या समस्या, असुविधा या निवेदनातून मांडताना कामगारांना न्याय मिळण्यासाठी मागण्यांवर सकारात्मक विचार करुन त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे. त्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी लवकरात लवकर सदर समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Read Next

तुर्भेत बोगस स्टाॅलवर मनपाची कारवाई