३० वर्षे जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य

नवी मुंबई : नवी मुंबई नगरपालिका कार्यक्षेत्रामधील विद्यमान इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करुन सदर इमारत धोकादायक असल्यास पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ अन्वये प्रवर्गनिहाय धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतात. सी-१ प्रवर्गातील इमारती या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिकाम्या करण्याबाबत त्या त्या सहकारी गृहनिर्माण संस्थाना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येते.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६५(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे, अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित गृहनिर्माण संस्थेने एक वर्षाच्या मुदतीच्या आत नवी मुंबई महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्याकडून करुन घेणे अनिवार्य आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम १९६८ अन्वये शासनाने जारी केलेल्या मॉडेल बाय-लॉ मधील मुद्दा क्र.७५ (अ)(ग्) नुसार इमारतीचे आयुर्मान १५ ते ३० वर्षांचे दरम्यान असल्यास किमान ५ वर्षातून एकदा तसेच ७५ (अ)(ग्ग्) नुसार  इमारतीचे आयुर्मान ३० वर्षापेक्षा जास्त असल्यास किमान ३ वर्षातून एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेणे अनिवार्य आहे. सदर स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकांमध्ये नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्याकडूनच करुन घेण्याबाबतची तरतूद आहे. त्यास अनुसरुन संबंधित सोसायटीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. याबाबतची दक्षता संबंधित सोसायटीचे अध्यक्ष-सचिव यांनी घेणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नजिकच्या काळात विद्यमान इमारतींमधील सदनिकांमध्ये अंतर्गत फेरबदलाची कामे -ज्यामध्ये लाद्या (इत्ददीग्हु) बदलणे, अंतर्गत असलेले आरसीसी कॉलम, बीम यांची दुरुस्ती करताना सदर सदनिकेच्या पलोअरिंगचा स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळण्याच्या घटना यापूर्वी नेरुळ, सेक्टर-१७ येथील जिमी टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, नेरुळ सेक्टर-६ येथील तुलसी भवन तसेच सन २०१६ मध्ये अशाच प्रकारच्या अपघाताने जीवितहानी झालेली असल्याच्या घटना नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत.

नवी मुंबई महापालिव्ोÀला लागू असलेल्या ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण-प्रोत्साहन नियमावली'आणि ‘महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन-नगररचना अधिनियम १९६६'मधील तरतुदी विचारात घेता इमारतींच्या रहिवास तथा वाणिज्य वापराच्या इमारतींमधील वरच्या मजल्यावरील गाळ्यांमध्ये अंतर्गत अथवा बाह्य भागात दुरुस्ती, स्ट्रेंग्थनींग करण्यासाठी परवानगी प्राप्त करण्याची आवश्यकता असल्यास महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्या प्रमाणपत्रासह नियमानुसार वास्तुविशारद मार्फत महापालिका कडून परवानगी प्राप्त करुन घेऊन त्यांच्या देखरेखीखाली अशी कामे करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे ज्या बाबींकरिता नियमावलीतील तरतुदीनुसार अंतर्गत फेरबदलाचे काम करताना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, अशा बाबतीत सदर काम करताना महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्या देखरेखीखालीच करण्यात यावे. तसेच सदरचे काम करतेवेळी संबंधित सदनिका, वाणिज्य वापराच्या गाळेधारकांनी संबंधित सोसायटीला अवगत करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित सोसायटीने सदर काम नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्या देखरेखीखाली होत असल्याची खात्री करावी.

भविष्यात विद्यमान इमारतींमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित सदनिका,  वाणिज्य वापराचे गाळेधारक यांना तसेच सोसायटीचे अध्यक्ष-सचिव यांनादेखील जबाबदार धरण्यात येईल. जेणेकरुन नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची कृपया नोंद घेण्याचे आवाहन महापालिकाच्या वतीने करण्यात येत आहे.

-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मतदार जनजागृती करिता ‘एनएमएमटी'चा पुढाकार