वैज्ञानिक दृष्टिकोन

प्रथम भारतीय विज्ञान नोबेल पारितोषीक विजेते डॉ चंद्रशेखर वेंकटरामन हे रामन रिसर्च इंस्टिट्युट या त्यांच्या संशोधन संस्थेत येणा-या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येकाला म्हणायचे, ”विज्ञान ही एक कठीण प्रेयसी आहे, आरोग्य आणि संपतीसाठी तुम्ही तिचे प्रियाराधन केले तर ती मुळीच बधणार नाही; पण तेच जर तुम्ही विज्ञान दृष्टिकोन मिळावायसाठी तिचं प्रियाराधन केलंत तर ती लगेचच तुम्हाला वश होईल”. नोबेल पारितोषीक हे जगातले सर्वोच्च पारितोषिक मानलं जातं. सर्वोच्च बहुमान असतो. नोबेल पारितोषिक हे अशा संशोधनाला दिलं जातं की ज्या संशोधनामुळे मानवजातीचा फायदा होतो, समाजाच्या व्यावहारिक समस्या ज्या संशोधनांनी सोडवल्या जातात.
लेखाची सुरुवात एका विनोदी किश्याने करतो. एकदा एक नेता पेट्रोल पंपाचं उदघाटन करायला गेला. कार्यक्रम दिमाखात पार पडला. चहा-पाणी झाले. निघण्यापूर्वी नेता महोदयांनी पंप मालकाला एक प्रश्न विचारला, एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की, तुम्ही हे कसं ओळखलंत की जमिनीत नेमकं या ठिकाणी पेट्रोल आहे ते?  तिथे जमलेल्या लोकांना काय करावं ते कळेना.. हसावं की रडावं? वाचून तुम्हालाही हसू आलं ना ? हसा जोरजोरात हसा, अगदी मनमोकळे हसा. हसायला पैसा लागत नाही; मात्र हसण्यानं शरीर निरोगी राहाते. हसणारा गरीब होत नाही किंवा हसवणाराही गरीब होत नाही. डॉ हेरिंग या शरीर विज्ञानाच्या तज्ञाच्या मते, जेंव्हा आपण जोरात हसतो तेंव्हा पोट, फुप्फूसं आणि यकृत यांना व्यायाम होतो. शिवाय रक्ताभिसरणाची प्रक्रिया व्यवस्थित चालते. पचनक्रिया चांगल्या प्रकारे कार्य करू लागते. हसण्यामुळे मनुष्य जोरात श्वास घ्ोतो. त्यामुळ फुप्फुसाचा व्यायाम होतो आणि त्याला विकार होत नाही. कारण ऑक्सीजनचा संचार रक्तात भरपूर होतो आणि रक्तात जमा झालेले दूषीत वायु आणि इतर त्रासदायक घटक शरीराबाहेर फेकले जातात. तेंव्हा जोरात हसायची संधी सोडू नका. हसा, जोरात हसा, आणखी जोरात हसा. जर रोगी हसला नाही तर तो बरा होण्याऐवजी आणखीनच आजारी होईल. हसण्यामुळे रक्तात अनेकविध हार्मोन्स सोडले जातात. व्यक्ती आरोग्यदायी बनते. प्रकृती ठणठणीत ठेवायची असेल तर हसायची संधी सोडू नका, हसा आणि निरोगी रहा व इतरांना निरोगी ठेवा. हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक पैलू.

वैज्ञानिक दृष्टिकोन या संबंधातली एक घटना इथे मला सांगावीशी वाटते. प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि प्रथम भारतीय विज्ञान नोबेल पारितोषीक विजेते डॉ चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी आपलं संशोधन रामन परिणाम (रामन इपफेक्ट) विज्ञान जगताला सादर केलं व त्यांना १९३० वर्षीचे नोबेल पारोतोषीक प्राप्त झालं. म्हणून आपण २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. रामन रिसर्च इंस्टिट्युट या त्यांच्या संशोधन संस्थेत येणा-या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येकाला ते म्हणायचे, ”विज्ञान ही एक कठीण प्रेयसी आहे, आरोग्य आणि संपतीसाठी तुम्ही तिचे प्रियाराधन केले तर ती मुळीच बधणार नाही; पण तेच जर तुम्ही विज्ञान दृष्टिकोन मिळावायसाठी तिचं प्रियाराधन केलंत तर ती लगेचच तुम्हाला वश होईल”. नोबेल पारितोषीक हे जगातले सर्वोच्च पारितोषिक मानलं जातं. सर्वोच्च बहुमान असतो. नोबेल पारितोषिक हे अशा संशोधनाला दिलं जातं की ज्या संशोधनामुळे मानवजातीचा फायदा होतो, समाजाच्या व्यावहारिक समस्या ज्या संशोधनांनी सोडवल्या जातात..अशाच संशोधनांना नोबेल पारितोषिक दिले जाते. एक दोन उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला कळेल. अलेक्झांडर पलेमिंंग यांना प्रतिजैविके अर्थात अँटीबायोटिक्स औषधाच्या शोधाबद्दल तर योनास साल्क यांना पोलिओ विरोधी लस शोधून काढल्याबद्दल देण्यात आलं. नोबेल पारितोषिक देण्याची कल्पना कोणाची, काय घडले की अशी पारितोषिके द्यावी लागली? आल्फ्रेड नोबेल हा त्याचा जनक. त्याने स्फोटकांचा शोध लावला आणि अमाप पैसा मिळवला. वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी तो जगातला एक श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जात होता. एके दिवशी त्याच्या कारखान्यात स्फोट झाला आणि त्यात त्याचा एक छोटा भाऊ लुडविग मरण पावला. त्या भागातील वृत्तपत्रांनी ती बातमी अशी छापली, ‘नोबेल यांचा मृत्यु'  ‘डायनामाईटचा संशोधक या जगातून अंतर्धान पावला.' नंतर एक शोकसभा झाली आणि त्यात त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली, ‘मर्चंट ऑफ डेथ पास्ड अवे' - ‘मृत्युचा व्यापारी मरण पावला.' स्फोटक द्रव्याची विक्री तो शास्त्रीय संशोधनसाठी आणि औद्योगिक क्रांतीसाठी करून भरपूर पैसा त्याने कमावला; पण त्याचबरोबर स्फोटक द्रव्याच्या सहाय्याने काम करताना अनेक लोक त्यात बळी गेले होते. वृत्तपत्रांनी नेमका कोणता नोबेल मरण पावला याची खात्री न करता लुडविगच्या ऐवजी आल्फ्रेड नोबेल मरण पावला असे जाहीर केले. ‘आपूले मरण पाहिले म्या डोळा' असाच काहीसा भास आल्फ्रेडला झाला. आपण काहीतरी भयानक प्रकार आहोत याची जाणीव त्याला झाली, "मी मेल्यानंतर जर मला अशीच कुप्रसिद्धी मिळणार असेल तर माझ्या संशोधनाचा, पैशाचा आणि माझ्या जगण्याचा काहीच उपयोग नाही.” नंतर मानवजातीसाठी काहीतरी लाभदायक करणे अत्यंत जरूरीचे आहे असे त्याला वाटू लागले. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी किंवा आधुनिक मानवाच्या विकासासाठी आपला पैसा उपयोगी पडावा यासाठी त्याने योजना आखली. त्या योजनेतूनच आजची नोबेल पारितोषिके अस्तित्वात आली. पदार्थ विज्ञान, रसायन विज्ञान, वैद्यकशास्त्र/जीवशास्त्र या मधील संशोधनासाठी तसेच अर्थ शास्त्र, समाजसेवा किंवा शांतता आणि साहित्य या क्षेत्रात नोबेल पारितोषिके दिली जातात. - डॉ. किशोर कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी