पंचनामा

मास्क ओळख लपवण्यासाठी..संरक्षणासाठी की...??
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आपली खरी ओळख लपविण्यासाठी नव्हे, तर संसर्गापासून संरक्षणासाठी मास्कचा वापर करणे मप्राप्त आहे. मास्क वापरल्याने आपण इतरांपासून तुटत असल्याची, तसेच स्वतःला लपवित असल्याची भावना निर्माण होते. मास्क, स्कार्फ या प्रकाराने आपली ओळख लपवून असामाजिक कार्याला गती देण्याचे प्रकारही घडताना दिसतात. काही महिला मुली मास्क, स्कार्फ वा दुपट्याने आपले तोंड झाकून आपल्या प्रियकराला, मित्राला भेटण्याची खेळी करतात. कधी-कधी पत्नी, मुलगी जवळून गेली तरी कोणाला ओळखू येत नाही. त्याचा फटका सज्जन बाया-मुलींना बसतो.

कोरोना महामारीच्या काळात आपले पूर्वीचे जीवन बदलून गेले होते. आपल्याला नव्या सवयी आत्मसात कराव्या लागल्या. प्रथम संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा अनिवार्य वापर ही त्यातील एक. मास्कमुळे कोरोनापासून काही प्रमाणात संरक्षण मिळत असल्याने घराबाहेर पडताना अनेकजण म्हणण्यापेक्षा प्रत्येकजण तो वापरत होता. कोरोनाची साथ संपता-संपता मास्क वापरावर काही प्रमाणात शिथिलता झाली, आताही थोडेफार लोक मास्क वापरताना दिसतात. मात्र, त्यात खाजगीपणा जपण्याचा मुख्य हेतू दिसत आहे.
तसे पाहता मास्क वापरण्याची काही लोकांची परंपराच आहे. मात्र त्या त्या मास्कच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. जैन धर्माच्या शिकवणीनुसार बाहेरील किंवा हवेतील जीवजंतू तोंडावाटे वा नाकावाटे शरीरात जाऊ नयेत व त्यांची हत्या होऊ नये म्हणून जैन मुनी आपल्या नाका-तोंडावर पांढऱ्या कपड्याची पट्टी बांधत असत व आजही बांधतात. वाळवंटात राहणारी मंडळी किंवा अरबस्थानात राहणारी मंडळी, वाळवंटातील वादळाला घाबरून, वाळूचे कण नाका-तोंडात जाऊ नयेत म्हणून मास्कसारखाच बुरखा वापरत असतात. अतिदक्षतेसाठी आपले डोके व कानही मोठ्या कपड्याने झाकून घेण्यात धन्यता मानतात. ती त्यांची स्व-संरक्षणाची प्रथा आहे. ती त्यांची भौगोलिकदृष्ट्या गरजही आहे. पण, आता त्याचाच फायदा उठवत काही लोक, आपले खासगीपण जपण्यासाठी मास्कचा वापर करत आहेत.

मधल्या काळात डाकू-चोर आपली ओळख लपवण्यासाठी नाका-तोंडावर कापड बांधून व डोळ्यावर फेटा बांधून आपली खरी ओळख न होऊ देण्यासाठी या प्रकाराचा वापर करताना दिसत असत. पण, म्हणतात ना जेव्हा काही गोष्टी फायद्याच्या असतात तशाच त्या काही प्रमाणात नुकसानीच्याही ठरू शकतात. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे. एका प्रतिथयश बाईने आपल्या भावना व्यवत करताना म्हटले आहे की, ‘गर्दीत वावरताना माझा खासगीपणा जपण्यासाठी मी आता मास्क वापरते. समाजात वावरताना महिला म्हणून माझ्यावर काही बंधने असतात. सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि गर्दीत मास्कमुळे मला थोडे संरक्षण मिळते. मास्कमुळे चेहरा बराच झाकला जातो, त्यामुळे लोकांच्या नजरांपासून बचाव होतो. महामारीपूर्वी मी कधी मास्क वापरत नव्हते, पण खासगीपणा जपण्यासाठी तो उपयुवत असल्याचे मला लक्षात आल्याने मी त्याचा वापर करते.' म्हणजेच, महामारीच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी उपयुवत असलेला मास्क आता अनेकांना त्यांचे खासगीपण जपण्यासाठी मदत करत असल्याचे दिसते.
महामारी काळात याच मास्कने जगभरात अंदाजे ४०२ अब्ज म्हणजेच ४० हजार दोनशे कोटीचा आकडा पार केला होता. तो आता कमी-कमी होत चालला आहे. त्यामुळे मास्क तयार कंपन्या घाट्यात चालल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या संख्येत घट होत चालली आहे. अर्थातच सध्या उच्च स्थानावर असलेल्या बेरोजगारीत वाढ होत चालली आहे. मात्र मास्कचा धंदा कमी होईल; परंतु बंद कधीच पडणार नाही.

सध्या मात्र समाजात वावरताना, कार्यालयात काम करताना, प्रवास करताना आपला खासगीपणा जपण्यासाठी मास्कचा वापर केला जातो आहे. त्याचा वापर करून अनेकजण आपली ओळख लपवित आहेत. तर काही लोकांना खासकरून वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना आपली खरी ओळख लपविण्यासाठी नव्हे, तर संसर्गापासून संरक्षणासाठी मास्कचा वापर करणे कमप्राप्त आहे. तसेच पूर्वी ‘क्षय'ग्रस्त लोकांना मास्कचा वापर सवतीचा होता व तो आजही आहे. ऑपरेशन थियेटरमध्ये तर सर्वांनाच तो सवतीचा व गरजेचा आहे. मात्र, सध्या अनेक क्षेत्रात मास्कचा वापर सवतीचा होत चालला आहे. काही क्षेत्रात लोकांना अगदी जवळ जावे यावे लागते. त्यामुळे एकमेकांच्या श्वासोच्छवासाने संसर्ग होण्याची शवयता टाळण्यासाठी मास्कची गरज भासते. तर काहींना लोकांच्या नजरा टाळायच्या असल्याने त्या-त्या व्यवती खासकरून महिला वर्ग मास्क वापरणे पसंत करतात.
सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता व तणाईच्या मानसिकतेचा विचार करता अनेक कुलीन तरूणींना मास्क वापरणे सुरक्षित वाटू लागले आहे. काही तरूणी मास्कऐवजी ‘स्कार्फ'चा वापर सर्रास करू लागल्या आहेत. त्यांच्या मते मास्क फवत नाक आणि तोंडा पूरताच मर्यादित आहे, पण स्कार्फमुळे नाका-तोंडासह, डोक आणि कानही झाकले गेल्यामुळे संपूर्णता सुरक्षितता येते व आपले पूर्ण खासगीपण झाकले जाते. फवत डोळे उघडे असल्याने त्या लोकांना पाहू शकतात, ओळखू शकतात; मात्र त्यांना ओळखणे कठीणच असते. मास्क आणि स्कार्फमुळे बहुतेक महिलांत वा मुलीत मोकळेपणा आला आहे. कारण त्यांची खात्री असते की, पहाणाऱ्याला त्या कशा दिसतात याची पूर्ण कल्पना येत नाही, त्यामुळे त्यांची वखवखलेल्या नजरांपासून सुटका होते.

मात्र सतत मास्क वापरणेही घातक ठरू शकते. मास्क हे दुधारी शस्त्राप्रमाणे आहे. मास्क वापरल्याने आपण इतरांपासून तुटत असल्याची, तसेच स्वतःला लपवित असल्याची भावना निर्माण होते, हेही सत्य आहे. सध्या समाज वेगळ्या वळणावर जात आहे, त्यात फार मोठे बदल झालेले दिसत आहेत. पूर्वी महिला-मुलींविषयी एक आदराची भावना होती. नाती-गोती जपली जात होती. पण आता ती कमी-कमी होत चालली आहे. आदराची जागा विकृतीने घेतली आहे. महिला मुलींना फवत ‘स्त्री' म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. कामवासनेचे शिकार समजले जाऊ लागले आहे, त्यामुळेच महिला-मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळेच महिला-मुली आपली सुरक्षितता जपायचा प्रयत्न करतांना दिसतात.

पूर्वीच्या काळी महिला-मुली घरीदारी किंवा सार्वजनिक ठिकाणीही स्वतःला सुरक्षित समजायच्या. कारण सर्व ठिकाणी त्यांच्याकडे आदरयुवत नजरेने पाहिले जायचे. त्याचप्रमाणे पिता, भाऊ वा इतर नातलग पुरुष त्यांच्या संरक्षणासाठी तत्पर असायचे. त्यामुळे त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करत नसे, मी मी म्हणणारे गुंडे-मवाली, घाबरायचे त्यांना मुलींच्या/महिलांच्या रक्षक पुरुषांबरोबरच पोलिस दलाचा व त्यांच्या दंडवयांच्या माराची भीती असायची. आता काळ बदलला आहे. विकृत सिनेमे, साहित्यामुळे, खान-पान-व्यसनाधिनतेमुळे तरूण, मध्यम व वयस्कर पुरुषांची मानसिकता मोठ्या प्रमाणांवर बिघडली आहे. ‘पैसा फेको तमाशा देखो' ची घमेंड आल्याने व पोलिसांची भीतीही नष्ट झाल्यामुळे ही विकृत पुरुष मंडळी, महिला-मुलींकडे कामूक नजरेनेच पाहतात व त्यांना पटवण्याचा प्रयत्न करतात. हे बहुतेक महिला/मुलींना आवडत नाही. त्या अशा पुरुषांपासून दूर राहण्यासाठी स्वतःला मास्क-स्कार्फच्या साधनांचा वापर करून वाचवण्याचा प्रयत्न करतात.

याउलट काही महिला-मुली स्वतःला हिरॉईन समजून वा मॉडर्न किंवा आधुनिकतेच्या विचाराने चालणाऱ्या समजून, भडक श्रृंगार, अपूरे कपडे, विविध प्रकारचे नखरे करन वात्रट व वखवखलेल्या पुरुषांना भडकावण्याचे, त्यांच्या कामवासनेला जागे करण्याचा खेळ करतात. परिणामस्वरूप त्याचा फटका सज्जन बाया-मुलींना बसतो. त्यांना सतत भीतीच्या छायेत वावरावे लागते.

ओळख वा सुंदरता लपविण्यासाठी मास्कच वापरला पाहिजे असेही नाही. जयपूर, भोपाळ, पुणे, नागपूर, अशा मोठमोठ्या शहरांसह आता खेड्या-पाड्यातूनही महिला-मुली दुचाकी वाहने चालवू लागली आहेत. ही वाहने चालवितांना अथवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना दुपट्टा वापरून चेहरा झाकून घेताना दिसतात. त्याचे कारण ऊन-वारा-धूळ यापासून चेहऱ्याची जपणूक व्हावी हे असले तरी, विखारी नजरेपासून वाचणे हेही आहे. पण म्हणतात ना नाण्याच्या दोन बाजू त्याचप्रमाणे याही प्रकाराने आपली ओळख लपवून असामाजिक कार्याला गती देण्याचे प्रकारही घडताना दिसतात. काही महिला मुली मास्क, स्कार्फ वा दुपट्याने आपले तोंड झाकून आपल्या प्रियकराला, मित्राला भेटण्याची खेळी करतात. कधी-कधी पत्नी, मुलगी जवळून गेली तरी कोणाला ओळखू येत नाही.

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक शांततेसाठीसुद्धा मास्क वापरला जाऊ लागला आहे. समाजात वावरण्यासाठी भीती वाटणाऱ्यांना मास्कमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता वाटते. असाच एक किस्सा : एक मुलगी आपल्या प्रियकराला घेऊन हॉटेलमध्ये बसली होती, तिने आपला चेहरा दुपट्याने झाकलेला होता. काही वेळात तिचा पिता आपल्या मित्रासह त्याच हॉटेलात..पण पाठच्या टेबलावर बसला. मुलीने बापाला पाहिले व तिने मोठी ऑर्डर न देताच फवत चहा पिऊन तेथून प्रियकरासह काढता पाय घेतला. जाताना ती आपल्या बापाजवळून निघून गेली, पण बापाला ओळखता आले नाही; मात्र त्याच्या मित्राने त्या मुलीला ओळखले मात्र तो काही बोलला नाही. मात्र हीच गोष्ट त्याने दोन दिवसांनी उघड केली.

याचाच अर्थ कोणत्याही नव्या वा जून्या संशोधनाला दोन बाजू असतात. एक फायद्याची; दुसरी नुकसानीची तेव्हा कोणत्याही गोष्टीचा गरजेपूरताच वापर योग्य कधी कधी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांना सुद्धा आपली ओळख लपविण्यासाठी मास्कचा आधार घ्यावा लागतो. प्रसारमाध्यमेही काही गोष्टी दाखवितांना चेहरा लपवून चित्र दाखवतात..त्यामागेही ओळख लपवणे हाच हेतू असतो. -भिमराव गांधले.  

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नानाची डबल ढोलकी...