मोबाईल

मोबाईल जणू ‘जीव की प्राण'

मोबाईलच्या व्यसनामुळे कित्येकांना आपले प्राण गमावे लागतात. तरी तरुणाईच डोके जागेवर येईना. मोबाईल जणू ‘जीव की प्राण' झाला आहे. टीव्ही पाहताना, जेवण करताना देखील मोबाईल चालू असतो. फेसबुक, व्हाट्‌सअप, इंस्टाग्राममुळे तर सर्वच वेडावले आहेत. त्यांना स्वतःचे भान राहत नाही. ‘अन्न परब्रम्ह' असे म्हणतात. पूर्ण लक्ष देऊन, एकाग्रतेने स्वच्छ होऊन जेवण करावे असे म्हणतात तरचं ते अंगी लागतं; पण यांना ते कोण सांगणार?

आज घडीला जग इतकं बदललं आहे की जग खेडं झालं आहे. खेडेगावात काही घडलं की थोड्यावेळात  सगळ्यांना कळतं; कारण खेडं खूप छोटं असल्यामुळे एखादी वार्ता थोड्याच अवधीत सर्वांपर्यंत पोहचते. तसे आज जगात होत आहे आणि याचे कारण म्हणजे आधुनिकीकरण.

 आधुनिकीकरणामुळे झालेल्या बदलांमध्ये आपण इतके वाहवत गेलो आहे की निखळ, स्वच्छंद जीवनाचा आनंद घेणे आम्ही विसरून गेलो आहे. याचा दाखला द्यायचं म्हटलं तर मोबाईल. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. संगणक, इंटरनेट, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे आजच्या तरुणाईला जणू ते व्यसनच लागले आहे.

मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे तर हे व्यसन अधिकच शिरजोर झाले आहे. सर्व तरुण-तरुणींच्या हाती मोबाईल दिसतो. जिकडे पहावे तिकडे सर्वत्र मोबाईल. रस्त्यावरून चालताना, बसमध्ये, ट्रेनमध्ये एवढेच काय तर अगदी जेवण करतानासुद्धा एका हातात मोबाईल असतो. शाळा-कॉलेज आणि कामानिमित्त घराबाहेर पाऊल  ठेवलं की लगेच मोबाईल चालू होतो. नेमकं काय चालतं त्यांचं त्यांनाच माहीत; पण एक मात्र की या मोबाईलमुळे त्यांचं रस्त्यावरून चालताना लक्ष नसतं. रस्ता ओलांडताना देखील ते आणि त्यांचा मोबाईल एकमेकात गुंतलेले असतात. वास्तविक रस्त्यावरून चालताना आणि रस्ता ओलांडताना आपण लक्ष देऊन रस्ता ओलांडला पाहिजे. शहरात एवढ्या गाड्या आहेत की त्यासाठी रस्ते कमी पडू लागले आहेत. कुठून कधी गाडी येईल, किती वेगात येईल याचे गणित आपण जुळवू शकत नाही. मोबाईलच्या व्यसनामुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागतात. तरी या तरुणाईच डोके जागेवर येईना.

मोबाईल जणू ‘जीव की प्राण' झाला आहे. टीव्ही पाहताना, जेवण करताना देखील मोबाईल चालू असतो. फेसबुक, व्हाट्‌सअप, इंस्टाग्राममुळे तर सर्वच वेडावले आहेत. त्यांना स्वतःचे भान राहत नाही. ‘अन्न परब्रम्ह' असे म्हणतात. पूर्ण लक्ष देऊन, एकाग्रतेने स्वच्छ होऊन जेवण करावे असे म्हणतात तरचं ते अंगी लागतं; पण यांना ते कोण सांगणार? बरं जेवण झाल्यावर लगेच झोपणार नाही. तास-दोन तास तो मोबाईल चालूच असतो. म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल असतो. बरेच जण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असतात. निसर्ग चक्र सांगते की वेळेवर झोपून पहाटे लवकर उठावे. ‘लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य धनसंपत्ती मिळे' असं म्हणतात; पण आजची तरुणाई निसर्ग चक्राच्या विरुद्ध वागताना दिसते. कधीही कुठेही खातात. रात्री उशिरा जेवण व उशिरा झोपतात. त्यामुळे अनेक आजार  व रोग बळावतात. आणि ह्या आजारांचे गांभीर्य लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

योग्य वापर
मोबाईल पूर्णपणे वाईट आहे असे नाही आपल्या नजरेप्रमाणे त्याचे आहे. नजर सर्वांनाच असते फरक एवढाच की कोण कोणत्या नजरेने पाहतो. मोबाईलमुळे जग प्रगत झाले आहे. खूप प्रगती झाली. चुटकीसरशी कामे होऊ लागली. तरुणाईने मोबाईलचा योग्य वापर करायला हवा. गरज असेल तेवढाच वेळ मोबाईल हाती घ्यावा. अभ्यासात मदत म्हणून मोबाईलचा वापर करावा. अधिक माहितीसाठी व सामान्यज्ञानासाठी मोबाईलचा वापर करावा. गरजेपुरतेच मोबाईलवर संभाषण करावे.

हे टाळा
 सतत मोबाईल हातात ठेवणे.
 सतत त्याला पाहणे (त्दम्व् -ल्हत्दम्व् करणे )
 उगाचचं  चॅटिंग करणे. रस्त्यावरून चालताना मोबाईलवर बोलणे.
 जेवण करताना मोबाईलशी खेळणे.
 रात्री उशिरापर्यंत जागणे.


थोडक्यात
 प्रत्येक गोष्टीत चांगला वाईटपणा असतो. त्या गोष्टीतून आपण काय घ्यायचे हे आपणच ठरवायला हवे. मोबाईलचे व्यसन लावून न घेता योग्य वापर करा. या सर्व भौतिक गोष्टी मानवाच्या प्रगतीसाठी असतात याचा विचार करा.
 पुन्हा एकदा विचार करा.  -शंकर कुंडलिक गोपाळे, कोपरखैरणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

राष्ट्रीय सेवा योजनाची निवासी शिबिरे