अपरिचित शिवराय

बटकींचा बाजार बंद करणारे शिवबा!

अनेक तरुण पोरी, यांचा तो पुण्यात भरणारा बाजार दररोज भरतोय आणि त्यास बटकीचा बाजार म्हणतात, हे समजल्यावर तर महाराज यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी त्या मुला-मुलींच्या विक्रीबद्दलचे हाकारे ऐकले आणि आपल्या घोड्यावरूनच चाबकाचे फटके त्या इस्लामी व्यापाऱ्यांना देण्यास, झोडपण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या व्यापारी मंडळीनीं आपल्या झग्यातून सुरे काढताच  महाराजांच्या सोबत असणाऱ्या साठ, सत्तर मावळ्यांनी त्यांना झोडपायला सुरुवात केली आणि काहीं मावळ्यांनी त्या बांधलेल्या पोरीपोरांना रस्सीतून मुक्त केले. 

 १६४३ साली शिवाजी महाराज हे बंगळूरवरून पुण्यात आले, ते महाराष्ट्रातून तिकडे गेले तेव्हा शिवबा होते, आज मात्र शिवराय बनून आले होते. गेले दोन पावणे दोन वर्ष महाराज हे बंगळूर येथे होते. मात्र त्या दोन वर्षात शाहजी राजे यांचा जणू काही ते प्रेषित असल्याचा अनुभव त्यांनी घ्ोतला होता, सहा ते सात वर्ष त्यांनी दिल्ली सम्राट शहाजहान बादशहाची झोप उडवली होती, मात्र माघार न घेता शब्द आणि वचन यास ते टिकले होते, ते आपले पिता शहाजीराजे भोसले यांच्याबाबत त्यांना नितांत अभिमान होता.

     शिवराय जेव्हा पुण्यात आले तेंव्हा ते फारच उध्वस्त असे ते पूनवडी कसबा होते. एक दिवस शिवराय हे आपल्या मित्रांसह कोरड्या पडलेल्या नदीपात्रातून घोडेस्वारी करत भरलेला आणि आठवड्यातून बहरलेला बाजार बघत चालले होते. नदीच्या एका काठावर त्यांना गोरगरिबांची लहान पोरं विक्रीसाठी पाय बांधून ठेवली होती, ते दिसले, एका दोरीत अनेक कोंबड्या बांधाव्यात तशा रीतीने चिमुकल्या पावलांना जखडून बांधले गेले होते.

    महाराज यांनी तो काळीज चिरत छिद्रे पाडणारा प्रकार बघितला आणि दुसरीकडे किळसवाणा लाज वाटावी असा तरुण पोरी-बायांचा बाजार भरला होता. लोक त्यांना चुटक्या काढत..तर काही जण चिमटे घेत. अब्रूचे धिंडवडे काढत किंचाळत होते. अनेक तरुण पोरी, यांचा तो भरणारा बाजार दररोज भरतोय आणि त्यास बटकीचा बाजार म्हणतात, हे समजल्यावर तर महाराज यांची तळपायाची आग मस्तकात गेली. दलाल लोक, मोठ्या मस्तीने बोंबलत होते, ले लो, ले लो, अभी अभी आया हूवा कडक माल ले लो, दुकान के लिए, या मकान के लिए ले लो, तोहफा देना हो या, खाना पकाना हो, बिस्तरके लिए ले लो!  हा क्रूर आवाज त्यांनी ऐकला आणि आपल्या घोड्यावरूनच चाबकाचे फटके त्या इस्लामी व्यापाऱ्यांना देण्यास, झोडपण्यास त्यांनी सुरुवात केली, तसे त्या व्यापारी मंडळीनीं आपल्या झग्यातून सुरे काढले, मात्र महाराज यांच्या सोबत असणाऱ्या साठ, सत्तर मावळ्यांनी त्यांना झोडपायला सुरुवात केली तर काहीं मावळ्यांनी त्या बांधलेल्या पोरीपोरांना रस्सीतून मुक्त केले.

       शिवराय जेव्हा लाल महालात परत आलेत तेव्हा त्यांना कळले हा बाजार तर काबूल, पेशावर, कंदाहार आणि सर्वत्र गुलामांचा बाजार म्हणून भरतो. मात्र महाराज यांनी जाहीर करून टाकले की, यापुढे आपल्या जहागिरीत असला प्रकार नाही चालणार.

    दुसरा प्रकार म्हणजे, कृष्णाजी बांदल याचा केलेला बंदोबस्त! हया बांदलाने हिरडस मावळ प्रांतात मुद्दामहून दादोजी कोंडदेव यांच्याकडील काही घोड्यांच्या शेपट्या कापून काढल्या आणि हुसकून दिले, खेड शिवापूरमध्ये महाराज यांना हे समजले. त्यांनी कान्होजी जेधे यांच्याकडून निरोप देऊन, त्यांना समजावले; मात्र तो ऐकेना.. तेव्हा त्यास चौरंग करून शिक्षा दिली.

     तसेच रांझे गावचे, खेड बेहऱ्याचे पाटीलकी असणारे बाबाजी बिन भिकाजी गुजर कुलकर्णी यांनी एका गरीब विवाहित सुनेच्या इज्जतीस हात लावला, तेव्हा महाराज यांनी याही प्रसंगी लाल महालात जो निर्णय घेतला आणि खेकड्याच्या नांग्या खुडाव्यात त्या प्रमाणे बाबाजी बिन भिकाजी गुजर कुलकर्णी यास हात पाय छाटून दुसरी चौरंग शिक्षा दिली आणि आता एका पाठोपाठ तीन वेगळे प्रकार, वेगळ्या शिक्षा देऊन बाल शिवबा हे शिवराय झाले, हे सिध्द होते.

   म्हणजेच पुण्यात आल्या, आल्या शिवराय आणि पुणे आणि मावळ प्रांतात आपली सत्ता प्रजा हित दक्ष असेल अशी चुणूक दाखवली. एकंदर महाराज आपण जसे वाचत जाऊ, तसे समजत जातात आणि गर्वाने छाती भरून येते. - प्रा. रवींद्र पाटील. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी