ऐतिहासिक पोखरण अणूचाचणी प्रक्रियेतील महत्वपूर्ण तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे दुःखद निधन

नवी मुंबई ःकेंद्रतील अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या ऐतिहासिक पोखरण अणूचाचणी प्रक्रियेतील एक महत्वपूर्ण तंत्रज्ञ भाभा अणूसंशोधन केंद्रातील तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.आध्यात्मिकदृष्टयाही बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले संजय चव्हाण जुईनगर येथील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर नेरुळ मधील सारसोळे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध  क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह भाभा अणुसंशोधन केंद्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कै. संजय चव्हाण यांच्या पश्चात पत्नी ,२ अविवाहित कन्या, २ भाऊ , ४ बहिणी आणि त्यांचे कुटुंबिय, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

संजय चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे  वाशीतील फोर्टीज्‌ रुग्णालयात गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. अखेर रक्तदाब घटल्याने ८  सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. संजय चव्हाण यांच्या पार्थिवावर अनंत चतुर्दशी दिनी नेरुळमधील सारसोळे मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. संजय चव्हाण यांच्या कन्या संवर्धिनी आणि संतृप्ती यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. याप्रसंगी भाभा अणूसंशोधन केंद्रातील  पीआयईडी विभागाचे प्रमुख अणूशास्त्रज्ञ डॉ.परितोष पी.नाणेकर, सेक्शन हेड अणूशास्त्रज्ञ  बी.एन. रथ, अणूशास्त्रज्ञ अश्विनीकुमार, तपनकुमार असेच अन्य वैज्ञानिक अधिकारी, अणूतंत्रज्ञ अतुल लिखिते, पुरुषोत्तम कोंडेस्कर, संजय धर्माधिकारी, शैलेश मातवणकर, सुरजकुमार, त्रिपाठी, साहू, राजेश जाधव, आर.सी. विश्वकर्मा, नरेश, वृÀष्णकांत कोळी यांच्यासह दैनिक पुण्यनगरी, मुंबई चौफेर, यशोभूमी वृत्तपत्र समुहाचे  मालक-संपादक प्रवीण शिंगोटे, महाव्यवस्थापक व्ही. आर. तळेकर, दैनिक नवशवतीचे संपादक संजय मलमे, ठाणे वार्ताचे संपादक संजय पितळे, पत्रकार अंकुश वैती, अशोक शेषवरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिलांकडून १०० किलो श्री मूर्तीचे विसर्जन