हर घर तिरंगा अभियान साठी कोंकण विभाग सज्ज -डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत कोकण विभागातील घरे, सरकारी-खाजगी आस्थापना तसेच ग्रामीण भागातील राष्ट्रध्वजाची एकूण मागणी संख्या ३७ लाख ३९ हजार ११८ असून त्यापैकी ३० लाख ५९ हजार ५०२  ध्वज उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून ८ लाख ७९ हजार ४४४ ध्वजांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. एकंदरीतच हर घर तिरंगा उपक्रमासाठी कोकण विभाग सज्ज झाले आहे, अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.


हर घर तिरंगा उपक्रमाच्या प्रचार-प्रसिध्दी आणि जनजागृतीसाठी कोकण भवन येथे ५ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आयुवत कल्याणकर बोलत होते. यावेळी उपायुक्त मकरंद देखमुख, उपायुक्त रविंद्र जाधव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, आदि उपस्थित होते.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे विविध उपक्रम राबवून साजरा होत आहे.  या महोत्सवाचा भाग म्हणून कोकण विभागात घरोघरी तिरंगा असा अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यत येणार आहे. घरोघरी तिरंगा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा आणि समाजातील सर्वस्तरातील जनतेमध्ये  देशाभिमान जागृत करणारा तसेच स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म्य पत्करलेल्या विरांपासून प्रेरणा घ्ोणारा आहे. सदर उत्सव साजरा करताना लोकसहभाग या कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यात लोकांच्या भावना, विचार आणि मते जुळलेली आहेत, असे आयुवत डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले.


घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात ध्वज उपलब्ध करुन देण्यासाठी व्यापारी बांधव, विविध संस्था-संघटनांची मदत मिळविण्यात येत आहे. या उपक्रमात ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ध्वजसंहितेचे पालन व्हावे. ध्वज स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा. सूत, लोकर, पॉलिस्टर, सिल्कचा ध्वज लावता येईल. प्लास्टिकचा असू नये. ध्वजाचा आकार ३×२ असावा. ध्वज मळलेला किंवा फाटलेला नसावा. ध्वजसंहितेचे पालन व्हावे. १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवाची आवश्यकता नाही. मात्र, शासकीय कार्यालयांना या संबंधी ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार असल्याचे आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी पत्रकार परिषदमध्ये स्पष्ट केले.


घरघर तिरंगा अभियान राबविण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून, निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विशेष बाब म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ५ ते १७ सप्टेंबर दरम्यान, स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहीम राबविण्यात येत आहे. यात रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यापासून सुरुवात करण्यात आली असल्याचे डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

योग्य वेतन द्या, नाही तर आंदोलन!