खारघर मधील सिडकोचे दोन फुटबॉल मैदान तयार 

खारघर - : भारतात 20 जानेवारी  ते 6 फेब्रुवारी दरम्यान महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील महिला फुटबॉल संघाचा समावेश आहे. या स्पर्धेतील काही सामने नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. सामन्यापूर्वी सराव सामने खारघर मधील फुटबॉल मैदानात रंगणार आहे. सदर मैदानावर आंतरराष्ट्रीय महिला संघ सामने खेळणार असल्यामुळे सिडकोकडून अल्पावधीतच उभारण्यात आलेल्या फुटबॉल मैदान विषयी क्रीडा प्रेमी कडून समाधान व्यक्त करीत आहे. 

      मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर सिडकोकडून खारघर मध्ये उभारल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट पार्कच्या पहिल्या टप्याचा कामाला सुरुवात झाली आहे.ओवेपेठगाव आणि रामशेठ ठाकूर महाविद्यालय शेजारील प्लॉट न 1 सेक्टर 33 येथील 10.7 हेक्टर जमिनीवर चार फुटबॉल मैदान एक फुटबॉल स्टेडियम  विकसित चे काम मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हाती घेण्यात आले होते. चार पैकी  दोन फुटबॉल मैदान तयार विकसित करण्यात आले असून या मैदानात वीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान भारतात होणाऱ्या महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषक स्पर्धेतील काही फुटबॉल सामने नवी मुंंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम मध्ये रंगणार आहे असून देश विदेशातील महिला संघ स्पर्धेपूर्वी सराव सामना खारघर मधील सिडकोच्या फुटबॉल मैदानात खेळणारा  आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सफाई कामगारांसाठी सुविधायुक्त हजेरी शेडचा प्रश्न ऐरणीवर