सायकल रॅलीद्वारे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा ऐरोलीत प्रचार

रॅली, प्रभातफेरी, पथनाट्य अशा वेगवेगळ्या उपक्रमांतून तिरंगा उपक्रमाचा प्रचार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालयाच्या वतीने निर्धार फाऊंडेशन यांच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्यतम सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर १९ ऐरोली येथील नेवा गार्डन पासून सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही सायकल रॅली अतिशय उत्साहात संपन्न झाली. यामध्ये 200 हून अधिक सायकलस्वारांनी सहभागी होत ही रॅली यशस्वी केली. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवायचा असून या उपक्रमाचा प्रचार या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक अशोक पाटील, अंकुश सोनवणे यांच्यासह अनेक सायकलपटूंनी उस्फूर्त सहभाग घेतला. रेल्वे अपघातात आपले पाय गमावलेल्या रमेश शुक्ला या दिव्यांग जिद्दी सायकलपटूनेही या सायकल रॅलीत  सहभागी होत सर्वांचा उत्साह वाढवला. यापुढेही अशा रॅली, प्रभातफेरी, पथनाट्य अशा वेगवेगळ्या उपक्रमांतून देशाभिमान व्यक्त केला जाणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छता अधिकाऱ्यांची मानसिक त्रासातून मुक्तता करण्याची मागणी