उघड्या वीज वाहिन्यांमुळे अपघाताचा धोका?

वाशी ः नवी मुंबई शहरातील गावठाण भागात वीज वाहिन्या उघड्या ठेवल्याने या वीज वाहिन्यांना विजेचा धक्का लागल्यास कुणा नागरिकाच्या जीवावर बेतण्याची शवयता असल्याने उघड्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नवी मुंबई शहरात महावितरण द्वारे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, नवी मुंबई शहरातील गावठाण भागातील वीज वाहिन्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे पुरते दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत असून, तुर्भे गाव, घणसोली, गोठिवली, तळवली गावामध्ये बहुतांश ठिकाणी वीज वाहिन्या उघड्याच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उघड्या वीज वाहिन्यांवरुन वाट काढताना नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. पाऊस पडल्यानंतर उघड्या वीज वाहिन्या पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना वाट काढताना विजेचा धक्का लागल्यास कुणाच्या जिवावर बेतण्याची भीती आहे. त्यामुळे उघड्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पाटील आणि खाजामिया पटेल यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यंदा डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ