भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड- मुंबई उरण पाइपलाइन विभागामार्फत स्वच्छ्ता पंधरवाडा  साजरा

उरण - भारत पेट्रोलियम कंपनीच्या एमयुपीएल पाईपलाईन विभागाच्या वतीने  व्यावसायिक आणि सामाजिक जाणिवेतून  सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवित  असतात. त्याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेची शाळा आणि जिल्हा परिषद शाळा, फुंडे गाव तसेच  उरण परिसरातील गाव पाड्यांमध्ये  "स्वच्छता पंधरवडा -२०२२" विधायक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कंपनीचे अधिकारी  संदीप टाकले , वरिष्ठ प्रबंधक,  मंगेश जाधव, सहाय्यक प्रबंधक रविंद्र कटकदौंड, सहाय्यक प्रबंधक,   हर्षल भाजीपाले, आणि शाळेतील शिक्षक,विद्यार्थी, ग्रामस्थ,  सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.  यावेळी  प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले  तसेच शालेय शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे वाटप केले.  तसेच  चित्रकला,निबंध स्पर्धा घेवून विजेत्यांचे कौतुक करण्यात आले.या शिवाय जिल्हा परिषद शाळा, ग्राम पंचायत कार्यालय , पोलीस ठाणे आदी ठिकाणी स्वच्छतेची  किट वाटप करण्यात आले. ह्या प्रसंगी शिक्षकांनी आणि उरण परिसरातील गावकऱ्यांनी BPCL कंपनीचे मनापासून आभार मानले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी शपथ घेतली तसेच ग्रामस्थांना आणि उपस्थितांना पेट्रोलियम पाइपलाइन चे महत्व आणि सुरक्षे संदर्भात माहिती देण्यात आली.

 या विधायक कार्यक्रमास कंपनीकडून अधिकारी वृंद माननिय  कनि अमुधन मुख्य महा प्रबंधक ,  संजीव काकन महा प्रबंधक, निलेश तिमोथी क्षेत्रीय प्रबंधक (पश्चिम क्षेत्र), ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या अभिनव उपक्रमासाठी पोलिसांकडून सहकार्य लाभले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सव-नवरात्रोत्सव बाबत महापालिकेने विकसीत केली इ-सेवा संगणक प्रणाली