तळोजा वसाहतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातुन सांडपाणी निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर

 खारघर : सिडकोने  तळोजा वसाहत मध्ये उभारलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून सांडपाण्याचा   निचरा होदत नसल्यामुळे तळोजा फेज एक वसाहती मध्ये गेल्या पंधरा  दिवसापासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे रहिवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

 

         तळोजा वसाहतीत सिडकोने सेक्टर 12 मध्ये  सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहे. मात्र सदर प्रकल्पातून   सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे  तळोजा सेक्टर दोन मधील दोन ग्रीन गार्डन  इमारती कडून डॉ पाटील क्लिनिक कडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच इतरही काही सेक्टर मध्ये गेल्या पंधरा  दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून रस्त्याला गटाराचे स्वरूप आले वाहत्या पाण्यातून शालेय विद्यार्थी आणि राहिवासीयांना मार्गक्रमण करावा लागत आहे. दुर्गंधी मुळे मच्छराचे प्रमाण वाढले असून परिसरात ताप आणि हिवताप आजार उद्भवण्याची शक्यता असून सिडको आणि पालिकेने योग्य ती दखल घेवून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहिवासीयांकडून केली जात आहे.या विषयी सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, पालिका अधिकारी समवेत पाहणी करून समस्या दूर केली जाईल.
 
कोट - तळोजा वसाहती मधील काही सेक्टर मध्ये रस्त्यावर  सांडपाणी येत आहे,  सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात जमा होत असलेला सांडपाणी निचरा होणे आवश्यक आहे, त्यासाठी तीन चार दिवसांपासून प्रयत्न केला जात आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.-प्रीतम  पाटील,विभाग प्रमुख मलनिस्सारण विभाग पनवेल महानगरपालिका.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला