खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला

नवी मुंबई : ठाणे बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यांची दखल मनपा आयुक्तांनी घेतली असून सर्व खड्डे भरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.त्यामुळे हे खड्डे भरण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.मात्र सदर काम करताना या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असून सोमवारी या मार्गावर सकाळी वाहनांच्या चार किलोमीटर लांब रांग लागली होती.

मागील एक आठवडा बरसत असलेल्या पावसामुळे नवी मुंबईत सर्वत्र खड्ड्यांचे  साम्राज्य पसरले होते. ठाणे बेलापूर मार्गवरील उड्डाण पुलांवर देखील मोठे खड्डे पडले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी एम एम आर डी ए क्षेत्रातील सर्व खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे या खड्ड्यांची दखल मनपा आयुक्तांनी घेतली होती व या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त खुद्द रस्तावर उतरले होते.आणि सर्व खड्डे भरण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते.त्यानुसार मनपा प्रशासनाच्या वतीने दिवस रात्र खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.मात्र ठाणे बेलापूर मार्गावरील ही खड्डे भरणी आता वाहन चालकांसाठी डोके दुखी ठरत आहे.त्यामुळे खड्डे भरताना सोमवारी या  मार्गावर  मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.आणि या वाहतूक कोंडी मुळे  पावणे ते महापे अशी चार किलोमीटर वाहनांची  रांग लागली होती

---------------------------------------------------

ठाणे बेलापूर मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू आहे

त्यामुळे सोमवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.मात्र काही वेळाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी ही वाहतूक सुरळीत केली.

राजीव शेजवळ, पोलिस निरीक्षक ,वाहतूक शाखा, महापे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

120 कर्मचा-यांना पदोन्नती देण्याचा आयुक्त अभिजीत बांगर यांचा कर्मचारी कल्याणकारी निर्णय