विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण 

पनवेल : प्रभाग क्र १८ मधील पाडा मोहल्ला येथील अंतर्गत गल्ली काँक्रीटीकरण करणे आणि भुसार मोहल्ला येथील गटार बांधणे हे काम सहकारी नगरसेवकांसह विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सातत्याने पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले. या कामाचे भूमिपूजन पार पडले. 

        तसेच प्रभाग क्र १८ मधील नवीन पनवेल सेक्टर 3 येथील प्लॉट नं.५६ येथील उद्यानात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीचा वापर करून बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे व नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर ३, प्लॉट ५७ येथील उद्यानात बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण पार पडले.

      यावेळी  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत, माजी नगरसेवक डी. पी.म्हात्रे, शेकापनेते प्रभाकर कांबळे, युवा नेते अतुल भगत, मंगेश अपराज, अविनाश मकास, दर्शन कर्डीले, रोहन गावंड, संदेश मोहन तसेच जेष्ठ नागरिक, सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रेल्वेच्या वरिष्ठ  अधिकाऱ्याकडून तळोजा भुयारी मार्ग आणि पेंधर रेल्वे फाटकची पाहणी