रेल्वेच्या वरिष्ठ  अधिकाऱ्याकडून तळोजा भुयारी मार्ग आणि पेंधर रेल्वे फाटकची पाहणी 

खारघर :  तळोजा रेल्वे फाटकवर परिसरातील भुयारी उभारलेल्या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात जवळपास  चार फुटापर्यंत पाणी  तुंबल्याने तळोजा वसाहत मधील राहिवासीयांना तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वे फाटक मार्गावरून ये जा करावे लागले होते. या विषयी रहिवासीयांनी रेल्वेकडे तक्रार केली होती,तक्रारीची दखल घेवून रेल्वेचे अतिरिक्त उपविभागीय व्यवस्थापक  प्रदीप पोळ यांनी शुक्रवारी पाहणी करून भुयारी मार्गात पाणी येऊ नये यासाठी उपाय योजना करावी असे निर्देश अभियंता विभागाला दिले.    

     दिवा - पनवेल रेल्वे मार्गावरील  तळोजा वसाहतिच्या प्रवेशद्वारवर असलेल्या रेल्वे फाटकच्या दोन्ही बाजूने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तळोजा रेल्वे फाटक शेजारी  50   कोटीहून अधिक रुपये खर्च करून भुयारी मार्ग उभारले आहे. भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने   50 हर्स  पॉवरचे एक आणि  25 हर्स पॉवरचे दोन पंप तसेच  वीज पुरवठा खंडित झाल्यास आपत्कालीन परिसस्थितीसाठी 200 केव्हीचा जनरेटर या ठिकाणी उभारले आहे, असेअसताना देखील  रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भुयारी मार्गात तीन ते चार फुटापर्यंत पाणी तुंबल्याने रहिवासीयांना थेट तीन किलोमीटर मीटर अंतर पार पेंधर रेल्वे फाटक मार्गे ये जा करावे लागल्याने यावेळी पेंधर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी काही रहिवासीयांनी रेल्वेकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेवून भुयारी मार्गात सिमेंट काँक्रीटच्या भितींतून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे रेल्वे कडून केमिकल टाकून बंद करण्यात येत आहे. पाहणीच्या वेळी पोळ  यांनी भुयारी मार्गात पावसाचे पाणी येवू नये या विषयी काळजी घावे असे निर्देश अभियंतां विभागाला दिले. तसेच यावेळी पेंधर रेल्वे फाटकवर दुसऱ्या बाजूने उभारण्यात आलेल्या रेल्वे फाटकवर सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे फाटक लवकर उभारण्यात यावे असे निर्देश दिले. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मि.एशिया बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी पटकावले गोल्ड मेडल