कारवाई टाळण्यासाठी रिक्षा,टॅक्सी चालक,मालकांनी कागद पत्रांची पूर्तता जलदगतीने करावी

नवी मुंबई: रिक्षा व टॅक्सी चालक, मालकांचे पोट हातावर असते. जानेवारी पासून कागद पत्रांची  पूर्तता नसेल तर दंडात्मक रक्कम वाढली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने वाहन पकडल्यावर दंड मोठ्या प्रमाणात होतो. हे टाळण्यासाठी जानेवारी मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यालयाच्या वतीने जनजागृती केली. परंतु काही घटकांनी एकले नाही. त्यामुळे ज्यांनी एकले नाही.त्यांना पकडल्यावर त्यांना आर्थिक दंड केला जातो. हे टाळण्यासाठी रिक्षा,टॅक्सी चालक व मालकांनी कागद पत्रांची पूर्तता जितकी जलदगतीने करता येईल तेवढी घाईने करा असे आवाहन वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाने २०२२या वर्षाच्या प्रारंभी रिक्षा व टॅक्सी वाहनांना लागणारी कागदपत्र अपूर्ण असतील तर त्यावर लावणाऱ्या दंडाची पाच ते दहा पट इतकी वाढ केली.हजार रुपये दंड असणारा दहा हजारावर गेला.यामध्ये लायसन्स नसेल पाच हजार व जर रिक्षा किंवा टॅक्सी चालवायला दिली असेल तर चालकाला पाच हजार तर वाहांनाच्या मालकाला पाच हजार असा दंड भरावा लागत आहे.फिटनेस ४५००,पीयूसी १०००,इन्शुरन्स २०००,परमिट १० हजार,वाहनावर लाल प्लास्टिकची पट्टी नसेल तर १हजार इतकी दंड आहे.हे सर्व दर पाच ते दहा पट जुन्या दंडाच्या रकमेवर कार्यान्वित करण्यात आले आहेत.

वाशी उपप्रादेशिक कार्यालयाने शासनाने दंडाची वाढ केल्यावर तत्काळ नवी मुंबईतील रिक्षा,टॅक्सी चालक व मालकांना एकत्र घेत दंडाच्या बाबत जनजागृती केली. तसेच दंडाची दुर्दैव कारवाई टाळायची असेल तर कागद पत्रांचा कालावधी संपल्यावर तत्काळ रीन्यू करा असा अनेकदा सांगण्यात आले होते.परंतु बहुतांशी चालक व मालकांनी यावर गंभीरपणे विचार केला नाही.त्यामुळे आजच्या परिस्थिती मध्ये दरदिवशी पन्नास ते शंभर रिक्षा,टॅक्सी चालक नियमबाह्य व्यवसाय करताना कारवाई केली जात आहे.त्यांना कमीतकमी वीस हजार पासून चाळीस हजार पर्यंत दंड लागत असल्याचे परिवहन सूत्रांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत 11 ते 17 ऑगस्टमध्ये प्रत्येकाने घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आयुक्तांचे आवाहन