महापालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारीवृंदांच्या कुटुंबियांना प्रिकॉशन डोस

नवी मुंबई : केंद्रीय आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘कोव्हीड 19 लसीकरण अमृत महोत्सव’ अंतर्गत 15 जुलैपासून 18 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोस दिला जात आहे. आरोग्य विभागासह नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतरही विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंदाने पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW)  म्हणून कोव्हीड लसीचा प्रिकॉशन डोस घेतला होता तथापि त्यांचे 18 वर्षावरील कुटुंबिय लसीकरणापासून वंचित होते.

आता 18 वर्षावरील सर्वांनाच प्रिकॉशन डोस देण्यास सुरूवात झाल्याने आज अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुबियांकरिता महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात प्रिकॉशन डोसचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये मुख्यालयातील आरोग्य विभागासह इतर विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्या घरातील 180 व्यक्तींनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला.

महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली ही रूग्णालये, तुर्भे व बेलापूर येथील माता बाल रूग्णालये तसेच 23 नागरी आरोग्य केंद्रे आणि ईएसआयएस रूग्णालय सेक्टर 5 वाशी येथे दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोस दिला जात आहे. तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन कोव्हीड झाल्यास त्याची तीव्रता कमी करणारा प्रिकॉशन डोस घेऊन लस संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उघड्या वीज वाहिन्यांमुळे अपघाताचा धोका?