सणांवरील निर्बंध हटवल्याने ढोल ताशा पथकांना येणार सुगीचे दिवस

नवी मुंबई--: मागील दोन वर्षे कोविड मुळे सार्वजनिक सणांवर  शासनामार्फत निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे यादरम्यान कुठल्याही प्रकरच्या मिरवणूक शोभा यात्रा न निघाल्याने ढोल ताशा वादकांचा व्यवसाय ठप्प होता. मात्र नुकतेच शासनाने  सणांवरील संपूर्ण निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार असल्याने ढोल ताशा वादकांना सुगीचे दिवस येणार आहेत.

पूर्वी महाराष्ट्रात शिवजयंती, महराष्ट्र दिन असो की  गणेशोस्तव हे सण ढोल ताशांच्या गजरा खेरीज साजरे होत नसत .मात्र हळू हळू  या ढोल ताशांची जागा कधीं डीजेनी घेतली  आणि ही कला लोप पावते की काय? अशी भीती पथकांना वाटू लागली होती. कारण मधल्या काळात डीजेचे वेड पसरले होते. मात्र डी जे च्या कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना खूप त्रास होऊ लागला. शेवटी न्यायालयाने डीजे वर बंदी घातली आणि पुन्हा या डीजेची जागा ढोलपथकांनी घेतली .

न्यायालयाने डीजे वर बंदी घातल्याने महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांना मागील पाच सहा वर्षात चांगले  दिवस आले होते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात, शोभा यात्रांत  या ढोल ताशा पथकांना दरवर्षी  मागणी वाढत चालली होती. मात्र मार्च २०२० मध्ये आलेल्या कोविडमुळे राज्यशासनाने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मनाई केल्याने गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव अशा  कार्यक्रमांच्या सुपाऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे या ढोलताशांच्या उत्पन्नावर पाणी फेरले होते. मात्र यंदा राज्य शासनाने सणांवरील निर्बंध हटवल्याने ढोल ताशांना सुपाऱ्या येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील दोन वर्ष बंद असलेल्या ढोल ताशांच्या व्यवसायाला सुगीचे दिवस येणार असल्याने या पथकांनी आतापासूनच सरावाला सुरुवात केली आहे.

आम्ही कर्ज काढून ढोल ताशा पथक उभे केले होते. मात्र कोविड मुळे मागील दोन वर्ष गुढीपाडवा व महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवाच्या सुपाऱ्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला होता. मात्र यंदा सर्व निर्बंध हटवले  गेले आहेत. त्यामुळे यंदा उत्सव जल्लोषात साजरे होणार असल्याने आम्ही देखील सरावाला लागलो आहोत. - सचिन पाठकअध्यक्ष,स्वराभीमान वाद्य पथक, कोपरखैरणे

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारीवृंदांच्या कुटुंबियांना प्रिकॉशन डोस