गणपती पावला!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेने घातलेल्या अटी रद्द

नवी मुंबई ः सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना घालून दिलेल्या अटी-शर्ती शिथील करण्यासाठी नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची १८ जुलै रोजी भेट घेतली. दरम्यान, यावेळी सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेश मुर्तीच्या उंची बाबत महापालिकेने घातलेली मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घ्ोण्यात आला.
येत्या ३१ ऑगस्ट रोजी श्री गणेशाचे आगमन होत असल्याने, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं'च्या मुर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकार यांना आदेश दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेने १४ जुलै रोजी एक पत्राद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना सभा मंडप मर्यादित जागेत उभारण्यात यावे, गणेशोत्सव सजावटीत भंपक बाजी नसावी, श्री गणेशाची मूर्ती ४ फुटापेक्षा जास्त नसावी, श्रीगणेशाचे आगमन-विसर्जन करताना मिरवणूक काढू नये तसेच गणेशोत्सव दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम नको अशा जाचक अटी महापालिकेने घातल्या होत्या.
 मुंबई, ठाणे येथील गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना तेथील महापालिकांनी परवानगी देतांना मूर्तीच्या उंची बाबत, तसेच मंडप, मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत कोणतेही निर्बंध घातले नसताना नवी मुंबई महापालिकेने मात्र कोरोना लॉकडाऊन दरम्यान सन-२०२१ मध्ये घातलेल्या अटी-शर्ती तशाच ठेवल्याने, गणेशोत्सव कसा साजरा करावा? असा प्रश्न नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पडला होता. त्यामुळे नवी मुंबईचा राजा शिवछाया मित्र मंडळ-तुर्भे, श्री भीमाशंकर सार्वजनिक उत्सव मंडळ-नेरुळ, नवसाला पावणारा वाशीचा महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेवटर-१७,  गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा गणेशोत्सव मंडळ सेवटर-१६ए वाशी, सीवुडस्‌ रेसिडेंन्स वेल्फेअर रहिवासी गणेशोत्सव मंडळ-सीवुडस्‌, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेवटर-१६ वाशी या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी १८ जुलै रोजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घ्ोऊन त्यांना गणेशोत्सव मंडळाच्या समस्या आणि महापालिकेच्या अटी स्थितील करण्याची मागणी केली.


यावेळी झालेल्या चर्चेनंतर गणेशोत्सव सभा मंडप आणि स्वागत कमानी उभारण्याबाबत, आगमन-विसर्जन मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम आदिंबाबत महापालिकेने घातलेल्या अटी मागे घ्ोत असल्याचे स्पष्ट करीत आयुवत अभिजीत बांगर यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या ‘एक खिडकी'च्या माध्यमातून देण्याचे मान्य केले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची पोलीस, अग्निशमन यासह अन्य परवानगी घेण्यासाठी धावपळ कमी होणार आहे. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे यावेळी आभार मानले.
महापालिका आयुवतांना भेटावयास गेलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या शिष्टमंडळात ‘शिवछाया मित्र मंडळ'चे अध्यक्ष अंकुश वैती, ‘वाशीचा महाराज गणेशोत्सव मंडळ'चे अध्यक्ष संपत शेवाळे, ‘सीवुडस्‌ रेसिडेंन्स वेल्फेअर सोसायटी गणेशोत्सव मंडळ'चे प्रणव म्हात्रे आणि रविद महाडिक, ‘गणराज वाशीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'चे अध्यक्ष विजय वाळुंजा, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, दरवर्षी सर्वच गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या अडचणी एकत्रितपणे सोडवण्यासाठी ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वेल्फेअर असोसिएशन'ची स्थापना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळोजा वसाहतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातुन सांडपाणी निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर