नवी मुंबई महानगरपालिकेतील ११९ अधिकाऱ्यांना पदोन्नती

नवी मुंबई -:नवी मुंबई मनपातील पदोन्नती रखडली होती.अखेर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी खुल्या वर्गातील ११९ जणांना बढती दिल्याने मनपाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.पुढील दोन वर्षात दोनशेपेक्षा अधिक अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना बढती मिळाल्याने प्रशासनातील कामांना प्रशासकीय गती मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या २०१७ च्या शासन निर्णय, नगरविकास विभागाच्या २०२१ मधील निर्णय अश्या विविध खात्यांच्या निर्देशानंतर आयुक्तांनी मे महिनाच्या अखेरीस या पदोन्नती वर मोहोर उमटविली होती. यानंतर एक महिन्याने पदोन्नती समितीने बैठक घेवून या पदोन्नतीच्या हिरवा कंदील दाखवला.अखेरीस प्रशासन विभागाने सोमवारी सुमारे ११९ जणांच्या खुल्या प्रवर्गातील पदोन्नती जाहीर केल्या आहेत. आता या पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना चौदा दिवसात नेमणुका दिल्या जाणार आहेत. कर,आरोग्य, लेखा,मालमत्ता,प्रशासन, उद्यान,विभाग कार्यालय, शिक्षण,घनकचरा व्यवस्थापन,परिमंडळ या विभागातील कारकून,माहिती नोंदणी,या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना द्वितीय वेतनश्रेणी मधील पदोन्नती देण्यात आली आहे.लिपिक टंकलेखक श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती मिळाली आहे.आता हे कर्मचारी वरिष्ठ लिपिक कर निरीक्षक या समकक्ष पदावर पदोन्नती बढती घेणार आहेत.सुमारे ११९ कर्मचाऱ्यांना आता अधिकारी पदावर वर्णी लागल्याने मनपा आस्थापना मध्ये अधिकाऱ्यांची संख्या वाढणार असून येत्या काही काळात नवीन कर्मचारी भरती झाल्यावर आणखी संख्या वाढणार आहे.मात्र वरिष्ठ लिपिक पदावरील अधिकारी अजूनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याने या अधिकाऱ्यांना लवकर पदोन्नती मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे.यातील शेकडो अधिकारी येत्या दीड ते दोन वर्षात निवृत्त होणार असल्याने या अधिकाऱ्यांना लवकर पदोन्नती मिळण्याची अपेक्षा आहे.सुमारे ९० बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांना १९हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपयांची वेतनश्रेणी लागू झाली असून सुमारे २९ कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता अनुसार २९ हजार २०० रुपये ते ९२ हजार ३०० या संवर्गातील वेतनश्रेणी लागू होणार आहे.

   

 

   
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 गणपती पावला!