महापालिका ‘शिक्षण व्हिजन'चा नावलौकीक

 

 

नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ यामध्ये नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून १३१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत मानांकित झाले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे महापालिका शाळा क्र.९१, दिवा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी स्वहम पितांबर पात्रा या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन करुन नवी मुंबई महापालिकेच्या गुणवत्तापूर्ण ‘शिक्षण व्हिजन'चा नावलौकीक उंचाविला आहे.


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या ३३ शाळांमधील इयत्ता ८ वीतील ५८२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तब्बल १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मानांकन पटकाविले आहे. या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला १२ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती रक्कम मिळणार आहे. सदर शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता १२ वी पर्यंत या विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'ची सदनिकांसह भूखंड विक्री योजना