पाम बीच मार्गालगत कोपरी गाव सिग्नल जवळ नाल्यात पडली कार

नवी मुंबई : एपीएमसी मार्केट मधून भर पावसात वाशीच्या दिशेने येणाऱ्या वेरणा कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार पाम बीच लगतच्या कोपरी सिग्नल जवळ आलेल्या नाल्यात कोसळण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने कार चालक वेळीच बाहेर पडल्याने तो बचावला. या दुर्घटनेत वेरणा कार नाल्यातील चिखलात फसल्याने कारचे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत बचावला गेलेला कार चालक मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केट मधून आपल्या वेरणा कारने वाशीच्या दिशेने येत होत. 

सकाळी जोरदार पाऊस सुरू असताना कोपरी सिग्नल जवळ कार चालकाचा कार वरील ताबा सुटला. त्यामुळे तो कारसह थेट नाल्यात कोसळला. येथील नाल्याला संरक्षक भिंत नसल्यामुळे आणि पाऊसही जोरदार पडत असल्याने कार चालकाला रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार थेट नाल्यात गेली. यावेळी कार चालक प्रसंगावधान दाखवत तात्काळ कारमधून बाहेर आला. त्यामुळे तो बचावला. दुपारी  नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी, कार नाल्यातील चिखलात गेल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित कार चालकाने तक्रार केली नसल्याची माहिती वाशी पोलिसांनी दिली.

दरम्यान, कोपरी सिग्नल जवळील नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने यापूर्वी देखील अनेक वाहने येथील नाल्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी मुसळधार पावसात देखील या नाल्यात भरधाव कार कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे या नाल्याला संरक्षक भिंत टाकण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आता दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी घेता येईल कोव्हीड प्रिकॉशन डोस