भाजपा अनु.जाती मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी राजेश शिंदे यांची नियुक्ती

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स येथील माजी नगरसेवक राजेश शिवाजी शिंदे यांची भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने हि नियुक्ती करण्यात आली असून भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदिप नाईक यांच्या हस्ते राजेश शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.  

मागील पंधरा वर्षाहुन अधिक काळ सामाजिक व राजकिय क्षेत्रात सक्रिय असलेले तुर्भे स्टोअर भागात राहणारे राजेश शिंदे यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आंबेडकरी चळवळीत देखील योगदान आहे. त्यामुळे भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदिप नाईक यांनी भारतीय जनता पार्टी अनु.जाती मोर्चाचे संघटन वाढवण्यासाठी व केंद्र शासनाने मागासवर्गीयांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून घेतलेले निर्णय यांचा प्रसार करण्यासाठी तसेच भाजपा जिल्हा भक्कम व मजबुत करण्यासाठी राजेश शिंदे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर राजेश शिंदे यांचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

लोकनेते दि. बा. पाटील जयंती दिनी  नवी मुंबईमध्ये महारोजगार मेळावा