प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांतून १ लाख ६५ हजार रुपये दंडवसूली


१८३ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहरासाठी नवी मुंबई महापालिका तर्फे विविध स्वरुपाचे प्रयत्न केले जात असून, नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापरु नये असे आवाहन करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यात येत आहेत.

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहरासाठी १० नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या दिवाळी पूर्वीपासून खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांना आणि प्रतिबंधित प्लास्टिकला अटकाव करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात धडाकेबाज प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये १८३ किलो प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. तसेच १ लक्ष ६५ हजार रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला.

यामध्ये बेलापूर विभागात १२ व्यावसायिकांवर कारवाई करीत ५० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करुन ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नेरुळ विभागात एका व्यावसायिकाकडून १ किलो प्लास्टिक जप्त करुन ५ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. वाशी विभागात ९ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती आणि ४० हजार रुपये दंड वसूली ७ व्यावसायिकांकडून करण्यात आली. तुर्भे विभागात २ व्यावसायिकांवर कारवाई करीत १० हजार रुपये दंडवसूली करुन ५ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.

कोपरखैरणे विभागात ३ व्यावसायिकांकडून १५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. ऐरोली विभागात अर्धा किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या जप्त करुन ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली. याशिवाय महापालिका परिमंडळ-१ भरारी पथकाने ४ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती केली. तसेच १० हजार रुपये दंडात्मक रक्कम २ व्यावसायिकांकडून वसूल केली. तसेच महापालिका परिमंडळ-२ भरारी पथकाने १०९ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करुन २० हजार रुपये दंडात्मक रक्कम ४ व्यावसायिकांकडून वसूल केली.

महापालिका तर्फे प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये एकूण ३२ व्यावसायिकांवर कारवाई करीत १८३ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती करुन १ लाख ६५ हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

 महापालिका उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) डॉ. बाबासाहेब राजळे, उपआयुक्त (परिमंडळ-१) सोमनाथ पोटरे आणि उपआयुक्त (परिमंडळ-२) डॉ. श्रीराम पवार यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकांनी सदर कारवाई केली.

महापालिका तर्फे प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये गेल्या ऑक्टोबर महिन्यातही २६४ किलो ४६० ग्रॅम प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात येऊन २ लक्ष ९० हजार रुपये रक्कमेची दंड वसूली ५८ व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्र प्लास्टिकमुक्त असण्याकरिता जागरुकतेने लक्ष देण्यात येत असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा तीव्रतेने राबविण्यात येत आहेत. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

लवकरच उरण-पागोटे एसटी बस सेवा ​​​​​​​