नेरूळ पोलिस ठाण्याच्या समोर भीमशक्ती संघटनेचे आंदोलन
नवी मुंबई-:मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने नेरूळ पोलिस ठाण्यात कौटुंबिक अत्याचार आणि अनुसूचित जात प्रतिबंधक कायद्याने तक्रार केली.यानंतर पोलिसांनी अजूनही आरोपी गजानन काळे याला अटक केली नाही म्हणून सामाजिक संघटना मैदानात उतरत आहेत.मुंबई येथील भीमशक्ती संघटनेने नेरूळ पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देवून पोलिस ठाण्या बाहेर मुक निदर्शने केली आरोपीला लवकर अटक केली नाही तर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात कौटुंबिक अत्याचार अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा नोंद आहे.काळे यांच्या पत्नीने ही तक्रार केली आहे.या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत सर्वच राजकीय पक्षांनी आरोपीला अटक करण्यासाठी कंबर कसली आहे.मुंबई येथील भीमशक्ती संघटनेचे विशाल भोगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नेरूळ पोलिस ठाण्यात जावून गजानन काळे यांना अटक करून त्यांच्या पत्नी संजीवनी काळे व मुलाला संरंक्षण देण्याची मागणी केली.पोलिसांनी काळे यांना अटक केली नाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पोलीस दलाली करतात का असा सवाल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.विधानपरिषद उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील पोलिस आयुक्तांना पत्र देवून अटकेची मागणी केली आहे.केंद्रीय समज कल्याण मंत्री रामदास आठवले यांची भेट संजीवनी काळे यांनी घेतल्यावर आठवले यांनी थेट पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क करून झाडाझडती घेतली.यावेळी यशपाल ओहोळ उपस्थित होते.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिलांनी नवी मुंबई येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले असताना त्यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.आर पी आय महिला आघाडीने संजीवनी काळे यांची भेट घेवून पाठींबा दिला आहे.जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आता या प्रकरणात उडी घेतल्याने गजानन काळे यांची अडचण वाढली आहे.