तीही तुमच्या आमच्यासारखी माणसेच की!

घाणेरड्या वासनेच्या आहारी जाऊ नका. मग ते स्त्री असू दे, पुरुष असू दे, वेश्या असू दे, तृतीयपंथातील लोक असू दे, HIV+ चे रुग्ण असू दे. सगळ्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा आनंद दिला तर आपण आणि आपले कुटुंब  आत्मसन्मानाने जगेल. कारण प्रत्येक गोष्टीचे रिटर्न्स येते. या जन्मी नाहीतर पुढील जन्मात येते.जसे कर्म तसे कर्मफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून कोणते कर्म करताना सांभाळून आणि सकारात्मक विचार करून करणे उचित!

राम कृष्ण हरि
श्री सद्गुरुवे नमः

तृतीय पंथातील लोक एक आत्मा आहे कुणी उकिरड्याचं खरकटं नव्हे ज्याला आपण अपवित्र करायला जाऊ..आम्हाला तुमच्या आधाराची, आत्मविश्वासाची गरज आहे. ती म्हणजे आपण सगळे त्या परमात्माचे अंश आहोत आणि तुमच्यात-आमच्यात आजही माणुसकीची दोरी आहे, जी कधी तुटणार नाही. खरंच हा विश्वास तुम्ही द्याल का आम्हाला ? खरंच बघा सापडतंय का तुम्हाला आमच्या वेदनांच्या प्रश्नाचं उत्तर....खरंच तृतीयपंथांच्या सर्व आत्म्यांची हीच घरा-घराची कथा आहे.

आज स्मिताक्षी जे काही लिहीत आहे ती त्यांची वास्तविक जीवनाची दुःखभरी व्यथा आहे. परमात्माने आपल्याला कर्म करण्यासाठी या युगात पाठवले आहे. चांगले कर्म केले तर त्याचे फळ निश्चितच चांगले मिळणार आहे. म्हणून मी स्वतः आपणा सर्वांस नम्र विनंती करते की या जीवनात मुलगा असू दे का मुलगी असू दे. त्यांच्यावर बलात्कार करू नका. घाणेरड्या वासनेच्या आहारी जाऊ नका. मग ते स्त्री असू दे , पुरुष असू दे, वेश्या असू दे, तृतीयपंथातील लोक असू दे, HIV+ चे रुग्ण असू दे. सगळ्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा आनंद दिला तर आपण आणि आपले कुटुंब तरंच आत्मसन्मानाने जगेल. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचे रिटर्न्स येते. मग या जन्मी नाहीतर पुढील जन्मात येते. मात्र जसे कर्म तसे कर्मफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून कोणते कर्म करताना सांभाळून आणि सकारात्मक विचार करून करा.

आत्मसन्मान द्या आणि आत्मसन्मान घ्या .
जर वेळ बदलायची असेल तर प्रथम आपले विचार सकारात्मक ठेवणे काळाची गरज आहे, तर सत्कर्म घडतील. म्हणून तृतीय पंथातील आत्म्यांना ते जसे आहेत तसे स्व आत्म्याने स्वीकारा. तेसुद्धा आपल्या समाजाचा भाग आहेत.त्यांनाही आनंदाने आपल्या सण-उत्सवात जगण्याचा, राहण्याचा अधिकार आहे.

तृतीय पंथातील लोक एक आत्मा आहे
कोणी उकिरड्याचं खरकटं नव्हे,
ज्याला आपण अपवित्र करायला.

त्यांना आपण स्व आत्म्याने स्विकारणे हे आपले उत्तम कर्म आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी घडते हे विसरू नये.

आई कुलस्वामिनीची इच्छा समजा ..
आतापर्यंत स्त्री आणि पुरुष ह्या दोनच लिंगाला समाजात दर्जा मिळाला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्यांना समाजात अजून आपल्या नजरेत तेवढा आत्मसन्मान मिळाला नाही. खरं तर हे समाजात वावरणारे दोन शिव -शक्ती आहेत, ज्यांचा समलिंग होऊन एक दैवी शक्ती बनली आहे. ते जेव्हा आत्म्याने खुश होतात तेव्हा परमात्मा आपल्यासाठी खुश होतात. म्हणून आता आपण लोकांमध्ये ह्यांच्या बद्दल आत्मसन्मान निर्माण केला पाहिजे.

जग बदलत चालले आहे. लोकांचे सकारात्मक दृष्टिकोन होणे काळाची गरज आहे. म्हणून आदिशक्ती कुलस्वामिनीच्या साक्षीने जर मंदिरात किंवा इतर चांगल्या पवित्र ठिकाणी ह्या तृतीय पंथाचे एक सुहासिन आदिशक्तीचे रूप समजून त्यांचा हळदी कुंकू करून आदर सत्कार केला तर त्यांचा आत्मसन्मान समाजात गौरवांकित होईल आणि त्यांच्याकडे एक छक्का या नजरेने बघण्याऐवजी एक स्त्री शक्ती म्हणून बघण्याचा आदर मिळेल.

आजवर हे कार्य कोणी न केल्याने समाजात आणि जगभरात आपल्या या तृतीय पंथ आत्म्यांची सकारात्मक शान वाढेल आणि आदिशक्तीची खरी नवरात्री साजरी झाल्याचा देवीला खरा आनंद होईल. खरंच तसं झालं तर हा सृष्टीचा आत्मसन्मान असेल. आपण त्यांना स्वीकारता किंवा नाही .परंतु मी तुमच्या सहित त्यांना स्व आत्म्याने आत्मसन्मान देण्यास पुढे पाऊल टाकले आहे कारण आपण त्यांना स्विकारतो म्हणजे त्यांच्यावर उपकार नाही करत. उलट आपण त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांचे  pay back  करत आहोत.

नाही का ...

बघा एकदा अंतर्मनाने विचार करून!

-स्मिताक्षी सूर्यकांत चिपळूणकर, मुलुंड. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बला बला बोलत सुटणारे