छत्रपतींच्या स्वराज्यातील रामराज्यांच्या पाऊलखुणा!

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, त्यानंतर शाहीर अज्ञानदास यांनी जो पोवाडा लिहिला, गायला त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की, ‘काय भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हास (अफजलखान) काय म्हणून?' एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात प्रभाव टाकणारा आणि प्रवास, प्रवाह राममय करणारा रामायण, महाभारत यांचा संदर्भ आणि जिजाऊ साहेब तसेच वाडवडिलांचा वाटा अनमोल आहे, हे जाणवते.

देशात रामाचा आणि राम नामाचा जय घोष, गजर होत आहे, बरोबर पाचशे वर्षानंतर ‘श्री राम' हे आपल्या जन्मस्थानी अयोध्या नगरीत विराजमान झाले आहेत, खूप हर्ष आणि अभिमान वाटावा असा हा संकल्प सिद्धीस, भारतवर्षात, भारताने नेला आहे. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातदेखील ज्या काही रामराज्याच्या पाऊल खुणा आधोरेखित झाल्या आहेत, त्या आजही आपणास दिसून येतात. महाराज हे देखील खूप सहिष्णू होते, त्यांनाही त्यांच्यासमोर जी सल होती त्यात, काशी येथिल काशी विश्वनाथेश्वराचे मंदिर औरंगजेबाने उद्ध्‌वस्त केल्याने महाराज व्यथित आणि खूपच चिंतीत असल्याची नोंद आहे, त्या आधीच बाबराने तर राम मंदिर ढासळून, त्या ठिकाणी असलेल्या राम मंदिर पाऊल वाटा बंद करण्याचा लबाडपणा केला होता.

       महाराज्यांच्या जीवनात आपण सखोल बघितल्यास आपणांस असे दिसते की, शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने, कवी परमानंदाने जो, शिवभारत ग्रंथ लिहला गेला आहे त्यात देखील, दहाव्या अध्यायात असा संदर्भ आहे की, शिवाजी महाराज बारा वर्षाचे असतानाच त्यांना महाभारत, रामायण आणि श्रुती यांची निंतांत आवड होती. ते त्या ग्रंथातील ज्ञान, जिजाऊ साहेब यांच्याकडून प्राशन करूनच शुर पुरुष झालेत. त्यांच्या जीवनात थोडे पुढे जाता शिवाजी महाराज यांना जे काही खास मोठी घराणे, साथ आणि साद देणारी होती, त्यात जेधे, बांदल हे खास असे होते, त्यांच्या घराण्याच्या, ‘जेधे शकावली' मध्ये अशी नोंद आहे की, ‘हनुमंत अगद रघुनाथला, तैसे बांदल शिवराजाला' यावरून शिवकाळ हा दोन्ही बाजूंनी श्रीराममय झाला होता, हे लक्षात येते.

       तदनंतर शाहिस्तखानाची जेव्हा प्रचंड मोठी सैन्य संख्या, संपत्तीने आणि टोळधाड बनून आली.  त्या वेळी सभासद बखरमध्ये अशी नोंद आहे की, ‘शाहिस्तेखानाची स्वारी म्हणजे कलियुगमधील रावण स्वारी होय, जशी रावणाच्या संपत्तीची गणना न करणे, तैसेच त्याच्या बरोबरीचा खजिना होय.' एकूणच जसे आपण शिव इतिहास वाचत राहतो, जातो आणि पाहतो तेव्हा आपल्या साक्षात लक्षात येते की, सर्व शिव छत्रपती काळ हा रामनामाने व्यापलेला आणि जपलेला आहे. अगदी तोरणा जिंकल्यानंतर महाराज यांनी मुरबे देवाच्या डोंगरावर, स्वतः नियोजनपूर्वक राजगड वसवला तेव्हा त्यांनी त्यांच्या मनात हवा तसा तो घडवला, मढवला आणि सजवलेला एकमेव किल्ला आहे. त्या किल्यावर ज्या काही माची आहेत त्यांची नावे शिवराय यांनी दिली आहेत, त्यात सुवेळा माची, संजीवनी माची आणि पद्मावती माची अशी होत. यात सुवेळा माची म्हणजे जेव्हा श्रीराम हे रावणाची लंका कशी दिसते म्हणून सुवेळा पर्वत चढून गेलेत आणि तेथून त्यांनी ती न्याहाळली, त्या सुवेळा पर्वताचे नाव महाराज यांनी दिले ते राजगडावरील माचीस; दुसरी माची म्हणजे संजीवनी माची, तिचा संदर्भ आपणांस रामायणात लक्ष्मण जेव्हा मूर्च्छित पडले, त्या वेळा हनुमंताने, द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणली होते, त्या संजिवनी वनस्पतीचे नाव महाराज यांनी आपल्या .. ‘हया', माचिस दिले होते. एकूणच लहानपणी जे रामायण महाराज यांनी ऐकले होते त्याचा प्रभाव इतका खोलवर झिरपत होता, हे जाणवते.

 जेव्हा महाराज यांनी अफजलखान वध केला, त्यानंतर शाहीर अज्ञानदास यांनी जो पोवाडा लिहिला, गायला त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की, ‘काय भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हास (अफजलखान) काय म्हणून?' एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात प्रभाव टाकणारा आणि प्रवास प्रवाह राममय करणारा रामायण, महाभारत यांचा संदर्भ आणि जिजाऊ साहेब तसेच वाडवडिलांचा वाटा अनमोल आहे, हे जाणवते.

      पुढे शिवकाळात असाही उल्लेख आढळतो की, जेव्हा शिवराय आणि शंभू राजे यांना केशव पंडित नावाच्या व्यक्तीने जेव्हा रामायण आणि महाभारत ऐकवले, तेंव्हा स्वतः शंभू राजे असे म्हणतात, ‘माझे वडील म्हणजे राजा दशरथ आणि त्यांचा मी मुलगा राम!'

     एकूणच छत्रपती संभाजी महाराज हे आस्तिक होते, धर्म आणि राष्ट्रधर्म यांची त्यांनी सांगड घातली होती. जेव्हा केंव्हा, विशेष प्रसंगी महाराज पाऊल टाकायचे तेव्हा त्यांना, त्यास भगवंताची जोड देऊनच... पुढची दिशा गवसली आहे. आग्रा प्रसंगी सतत शिव पिंड सोबत असो, की भवानी तलवार उल्लेख असो, सर्व किल्ल्यांवर शंकराचे मंदिर असो..यातून महाराज खूप धार्मिक होते, मात्र त्यांचे हेच धार्मिकत्व डोळस असे राष्ट्रीयत्व पेरण्यासाठी अविरत पखरण करत होते, हे दिसून येते. -प्रा. रविंद्र पाटील. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्राणप्रतिष्ठापना...!!