आयुवत नार्वेकर यांचे आरोग्य विभागाला सज्जतेचे निर्देश

कोव्हीड-एन्पल्युएन्झा रुग्णसंसर्गः महापालिका सतर्क

नवी मुंबई ः मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये नियंत्रणात आलेल्या कोव्हीड आजाराचा प्रार्दुभाव तसेच एन्पल्युएन्झा (एच३एन२) संसर्ग या दोन्ही आजाराची रुग्णसंख्या आता वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्याअनुषंगाने सजगता राखत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष बैठक घ्ोत संपूर्ण आरोग्य यंत्रणेस सतर्कतेचे निर्देश दिलेले आहेत.  

नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील विशेष समिती कक्षात आयुक्त नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सदर बैठकीप्रमाणेच सर्व रुग्णालय प्रमुख आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेमध्ये सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्रनाथ सहाय यांच्यामार्फत एन्पल्युएन्झा (एच३एन२) या आजाराचा प्रसार, उपचार आणि प्रतिबंध याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित डॉक्टर्सनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
मागील काही दिवसांमध्ये करोना रुग्ण वाढत असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून महापालिकेची डेडीकेटेड कोव्हीड सेंटर्स (ण्प्) तसेच डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालये (ण्प्ण्) येथे २५ मार्च पर्यंत मॉकड्रील पूर्ण करुन साधन सामग्री उपलब्ध असल्याची तसेच ती सुस्थितीत कार्यान्वित असल्याची खातरजमा करुन घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कोव्हीड पोर्टलवर उपलब्ध खाटा (ऑक्सीजन, आयसोलेशन, आयसीयू बेडस्‌) आणि इतर साधन सामग्रीची माहिती अद्ययावत करण्याचेही आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडून निर्देशित करण्यात आले.
उपलब्ध औषधांच्या स्टॉकची खातरजमा करावी. तसेच स्टॉक अद्ययावत करावा. त्याचप्रमाणे सर्व ऑक्सिजन प्लान्ट आणि एलएमओ सुस्थितीत आहे याची खातरजमा करावी. तसेच ऑक्सिजन सिलींडर, एलएमओ टँकमध्ये आवश्यकतेनुसार ऑक्सिजन आणि एलएमओ भरुन ठेवावा, असे निर्देश आयुवत नार्वेकर यांनी यावेळी दिले.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

९ महापालिका अधिकारी-कर्मचारी  चौकशी प्रकरणात दोषी