आगीवरील तेल कंपन्यांची तयारी तपासण्यासाठी ऑफ साइट मॉक फायर ड्रिल प्रात्यक्षिकांचे आयोजन 

घातक व ज्वलनशील कंपन्यांचे तुर्भे येथे प्रात्यक्षिक सादर 

नवी मुंबई :- घातक आणि ज्वलनशील  उत्पादन  हाताळताना तेल टर्मिनल वरून पेट्रोल पंपावर हस्तांतरण करताना अलार्म सिस्टीम कशी असावी, तसेच प्रसंगी काही दुर्घटना घडली तर कशी हाताळावी आग लागली तर कशी विझवावी याची प्रात्यक्षिक नवी मुंबईतील चार रासायनिक कंपन्यांनी एकत्रित तुर्भे एमआयडीसी येथे सादर केली .

        नवी मुंबई शहरामध्ये एचपीसीएल आणि आयओसीएल सारख्या तेल कंपन्या वसलेल्या आहेत.  या तेल कंपन्या घातक उत्पादन हाताळतात. हे घातक आणि अत्यंत ज्वलनशील उत्पादन देखील तेल टर्मिनल वरून पेट्रोल पंपांवर दररोज हस्तांतरित केले जाते. हे सर्व टँक व ट्रक उच्च तंत्रज्ञान ट्रॅकिंग उपकरणे, अलार्म सिस्टम आणि पॅनिक बटणांनी सुसज्ज आहेत. टँकर व ट्रक ड्रायव्हर हेल्पर्ससाठी इतके प्रशिक्षण आणि वर्ग करूनही कधीकधी अपघात होऊ शकतात.अशा वेळी काही दुर्घटना झाली तर कशी सामोरे जायचे त्यासाठी नवी मुंबई मध्ये एचपीसीएल डब्लूओटी, आयओसीएलड ब्लूओटी, एचपीसीएल बीओटी आणि आयओसीएल ग्रीस प्लांटच्या सर्व चार तेल कंपन्यांनी आगीवरील तेल कंपन्यांची तयारी तपासण्यासाठी ऑफ साइट मॉक फायर ड्रिल प्रात्यक्षिके आयोजित केले होते.

       या प्रशिक्षणाचे निरीक्षण करण्यासाठी ठाणे कारखाना संचालक विलास घोगरे,उप  संचालक योगेश पतंगे, पी.एल.पाटील  आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच एच पी सी एल डब्लू ओ टी   आणि बी ओ टी  यांच्या कडून अश्विन डी कुरील, आय ओ सी सी एल डब्लू ओ टी   यांच्याकडून बिधान चंद्र बिस्वास  आणि आय ओ सी एल   ग्रीस प्लांटचे आर रविराज उपस्थित होते. यावेळी पंकज नंदनवार सुरक्षा अधिकारी एचपीसीएल सहाय्यक संघाचे प्रतिनिधित्व  करत होते, तर सुरक्षा अधिकारी आशिष तिवारी   हे फायर कॉम्बॅट टीमचे प्रतिनिधित्व करत होते .  दीपक मोंगा सेफ्टी ऑफिसर आय ओ सी एल  ग्रीस प्लांट यांनी  रेस्क्यू टीमचे प्रतिनिधीत्व केले. 

आय ओ सी एल तुर्भे  सर्व्हिस रोडवर एका अनियमित टॅम्पोचे नियंत्रण सुटले आणि आय ओ सी एल   टँक ट्रकला अपघात झाला आणि  टेम्पोच्या मागील बाजूने धडकला , त्याच प्रकारे  एच पी सी एल  टँक ट्रकने आय ओ सी एल   टँक ट्रकला मागून धडक दिली यावेळी  झालेल्या  दुहेरी अपघातामुळे ३  लोक जखमी झाले. टेम्पो आणि आयओसीएल टँक ट्रक चेंबरच्या मागील बाजूने धड्कल्यमुळे चेम्बर मधून गळती होऊ लागली.आय ओ सी एल   ड्रायव्हरने ही घटना आय ओ सी एल   सुरक्षा अधिकाऱ्याला कळवली आणि तात्काळ आय ओ सी एल , एच पी सी एल आणि ग्रीस प्लांटची टीम आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने ३ जखमींना वाचवले . त्यानंतर अग्निशमन दलाने ९  किलो अग्निशामक यंत्रासह आग विझवण्यास सुरुवात केली. एक एक करून ६  फायर एक्स्टिगुशर वापरण्यात आले. त्यानंतर एचपीसीएलचे फोम टेंडर वापरुन अवघ्या १५ते २० मिनिटात  आगीवर नियंत्रण मिळवत प्रात्यक्षिक सादर केले .

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

सिध्दार्थ बांठिया यांनी ‘काँग्रेस'चा हात सोडून ‘भाजपा'चे कमळ घेतले हातात