आगरी बोलीभाषेला आज राजदरबारी ओळख - महिला अध्यक्षा जेष्ठ साहित्यिका दमयंती भोईर

कोपरखैरणे येथे १९ वे आगरी साहित्य संमेलन संपन्न

नवी मुंबई ः गेल्या २२ वर्षापासून ‘आगरी साहित्य संमेलन'ची चळवळ अविरतपणे सुरु आहे. नवे विचार, नवे साहित्यिक आगरी भाषेत निर्माण होत आहेत. त्याची फलश्रुती म्हणजे विद्यापीठ अभासक्रमात आगरी भाषेतील पुस्तकाला स्थान प्राप्त झाले आहे. आगरी बोलीभाषेला आज राजदरबारी ओळख निर्माण झाली असून तीी गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन ‘आगरी साहित्य संमेलन'च्या पहिल्या महिला अध्यक्षा जेष्ठ साहित्यिका दमयंती भोईर यांनी केले . आगरी समाजाच्या १९ व्या ‘आगरी साहित्य संमेलन'चे उद्‌घाटन जी.पी.पारसिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी कोपरखैरणे येथील ‘ज्ञान विकास संस्था'च्या महाविद्यालय प्रांगणात  संपन्न झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ‘ज्ञान विकास संस्था'चे संस्थापक अध्यक्ष ॲड. पी. सी. पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष तथा आगरी समाज नेते दशरथ पाटील, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्यासह डी.डी.घरत, संमेलन कार्यवाह ॲड. प्रसाद पाटील, रवीशेठ पाटील, चंद्रकांत पाटील, महापालिव्ोÀचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, ‘आगरी साहित्य विकास मंडळ'चे संस्थापक-अध्यक्ष मोहन भोईर, पुंडलिक म्हात्रे, चंद्रकांत मढवी, संदीप पाटील उरणकर, आगरी कवी रामनाथ म्हात्रे, भानुदास पाटील, आदि उपस्थित होते.

नवी मुंबई शहरात नव नवीन प्रकल्प आणि उद्योगधंदे आले; मात्र आगरी पारंपरिक व्यवसाय नष्ट झाले. जमिनी गेल्या त्याचा पैसा  दहावाट्यानी संपला. आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष व्हायला हवा होता, तो झाला नाही. अशा प्रतिवुÀल परिस्थितीत आज आगरी समाज शिकतोय. जागतिक स्पर्धेत विविध क्षेत्रात नावलौकिक  प्राप्त करतोय. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही यापुढे  घुसळण होणे गरजेचे असल्याचे साहित्यिका दमयंती भोईर यांनी सांगितले यावेळी ‘संमेलन'च्या पहिल्या सत्रात पारसिक बँकेचे संस्थापक कै. गोपीनाथ पाटील आदर्श व्यक्तिमत्वाचा ठसा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षपदी माजी खासदार जगन्नाथ पाटील उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी संमेलनाध्यक्षा दमयंती भोईर यांची प्रदीर्घ मुलाखत घ्ोतली. दुपारच्या सत्रात मीनाक्षी तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्यातील आगरी महिलांच्या साहित्याचा
ठसा या विषयांवर महिलांनी भाषणे केली. सायंकाळी खुले कवी संमेलन झाले. अनेक विषयांवर चर्चासत्र घ्ोण्यात आली. त्यात प्रामुख्याने महिलांवरील अत्याचार, आदि  विषयांचा अंतर्भाव होता. प्रारंभी सकाळी प्रथम ग्रंथदिंडी काढून साहित्य संमेलनास सुरुवात झाली. कोपरखैरणे परिसरातून विद्यार्थ्यांनी ग्रंथांची पालखी काढली. यावेळी ॲड. पी. सी. पाटील (शिक्षण महर्षी), ह.भ.प. सुनिल महाराज रानकर (वारकरी संप्रदाय), ह.भ.प. सोपान महाराज म्हात्रे, पुंडलिक म्हात्रे (आगरी भूषण), प्रकाश तांडेल (क्रीडा भूषण), दीपक ह.पाटील (आगरी समाज भूषण ), देवराम मरोड आणि हरिश्चंद लंगडे (वारकरी संप्रदाय, इगतपुरी-नाशिक), मीनल माळी, सुविधा पाटील तसेच जनार्धन पाटील आदिंना आगरी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी विभागात पाणीबाणी