घणसोलीमध्ये सिडकाेनिर्मित मेघ मल्हार गृह संकुलामध्ये अनियमित, कमी दाबाने पाणीपुरठा

घणसोलीतील सिडको निर्मिती संकुलात पाणीबाणी

नवी मुंबई -: घणसोली मध्ये सिडको मार्फत सिडको मार्फत सर्व साधारण नागरिकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. मात्र येथील  रहिवाशांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या इमारतींना २४ तासात केवळ एकच तास पाणी पुरवठा होत असल्याने या संकुलात पाणी बाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे संकुलातील नागरीकांनी संकुल आवारात अनियमित पाणीपुरवठया विरोधात आवाज उठवत बांधकाम निर्मिती करणाऱ्या शिर्के कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.  

       सिडकोने घणसोलीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस) मधील नागरिकांसाठी मेघ मल्हार नावाने गृह संकुलाच निर्मिती केली आहे. मात्र या इमरितीतन अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरठा होत आहे. मेघमल्हार गृहसंकुलात गेल्या एक वर्षांपासून नागरी वस्ती वाढली आहे. मेघमल्हारला करिता ३ पाण्याच्या टाकी बसवण्यात आलेल्या आहेत. एल १ ते एल ९ याकरिता २ टाकी उपलब्ध आहेत, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस)च्या ५ इमारती आणि अल्प उत्पन्न गट  (एलआयजी) मधील १ इमारत अशा ६ इमारतींकरिता केवळ एकच टाकी उपलब्ध आहे. त्यातही याठिकाणी दर १५ दिवसांनी पाण्याची समस्या भासते अशी माहिती येथील रहिवासी सुमित रेनोसे  यांनी दिली आहे. तर गणेश चतुर्थी पासून या संकुलात केवळ १ तास पाणी येत असून ते ही अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. सिडकोने नियोजन करताना पाण्याचे  सुनियोजन करण्यात आलेले नाही अशी ओरड येथील रहिवाशांमधून होत आहे. नवी मुंबई शहराला स्वतः च्या मालकीचे धरण आहे. नवी मुंबई शहरातील घणसोली विभाग हा विकसित झालेला आहे.

अशा शहरात आजही नागरिकांना पाण्याची टंचाई भासत असल्याने सोमवारी येथील रहिवाशांनी संकुल आवारात सिडको आणि बांधकाम निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधात आंदोलन केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐतिहासिक पोखरण अणूचाचणी प्रक्रियेतील महत्वपूर्ण तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे दुःखद निधन