दोन वर्षांनी काहीशा शिथिल निर्बंधांमध्ये भक्तीमय नामगजरात श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप

नवी मुंबई ः कोव्हीड प्रभावित कालावधीनंतर दोन वर्षांनी काहीशा शिथिल निर्बंधांमध्ये अतिशय उत्साहात साजऱ्या झालेल्या श्री गणेशोत्सवाच्या दहाव्या अर्थात अनंत चतुर्दशीच्या विसर्जन दिनी भाविकांनी 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' अशा भक्तीमय नामगजरात श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप दिला.

नवी मुंबई महापालिकेमार्फत सर्व विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये एकुण ८६0८ घरगुती व 4८८ सार्वजनिक अशा एकूण 909६ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यामध्ये पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवर 4८32 घरगुती तसेच 4५७ सार्वजनिक अशा ५2७9 श्रीमूर्तींचे तसेच मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या 134 कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती देत त्या ठिकाणी 3७७६ घरगुती व 41 सार्वजनिक अशा 3८1७ श्रीमूर्तींचे भाविकांमार्फत विसर्जन करण्यात आले.

विसर्जनस्थळांवर नियोजनबध्द व्यवस्था

 महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, दोन्ही परिमंडळाचे उपआयुक्त संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.

 नागरिकांची कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती

अशाच प्रकारची सुयोग्य व्यवस्था 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवरही करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी मंगलमय वातावरणात घरीच श्रध्दापूर्वक श्रीमूर्तींचे विसर्जन केले.


निर्माल्यातून होणार नैसर्गिक खतनिर्मिती

गणेशोसत्सव निमित्त प्रदर्शित होर्डींगमधून 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' च्या अनुषंगाने शहर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. सर्व विसर्जनस्थळी ओले व सुके निर्माल्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते व हे निर्माल्य वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या 40 टनाहून अधिक जमा ओल्या निर्माल्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्र खत निर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.

 श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विसर्जन स्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर परंपरेनुसार पुष्पवृष्टी करण्यात आली. याकरिता चौकामध्ये विशेष मंडप व उंच व्यासपीठ उभारण्यात आले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोलीमध्ये सिडकाेनिर्मित मेघ मल्हार गृह संकुलामध्ये अनियमित, कमी दाबाने पाणीपुरठा