दीड दिवसांच्या ९०७७ श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २२ पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर श्रीगणरायाच्या ९०७७ मुर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या वतीने सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या चोख विसर्जन व्यवस्थेत दीड दिवसाचा विसर्जन सोहळा नियोजनबध्द रितीने पार पडला.


नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २२ पारंपारिक विसर्जन स्थळांवर ६५५५ घरगुती आणि ११ सार्वजनिक अशा दीड दिवसांच्या ६५६६ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये बेलापूर विभागात ५ विसर्जन स्थळांवर १७०१ घरगुती आणि ३ सार्वजनिक, नेरुळ विभागात २ विसर्जन स्थळांवर ९१२ घरगुती आणि ४ सार्वजनिक, वाशी विभागातील २ विसर्जन स्थळांवर ६७१ घरगुती, तुर्भे विभागात ३ विसर्जन स्थळांवर ३९६ घरगुती आणि ३ सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात २ विसर्जन स्थळांवर ८१४ घरगुती, घणसोली विभागात ४ विसर्जन स्थळांवर १०६० घरगुती आणि १ सार्वजनिक, ऐरोली विभागात ३ विसर्जन स्थळांवर ८३२ घरगुती, दिघा विभागात १ विसर्जन स्थळावर १६९ घरगुती अशा एकूण ६५५५ घरगुती आणि ११ सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ६५६६ श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.


यावर्षी कोव्हीड निर्बंधांमध्ये काहीशी शिथीलता असल्याने गणेश भक्तांचा उत्साह पाहता विसर्जनस्थळांवर गर्दी होऊ नये यादृष्टीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर १३४ कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. सदर कृत्रिम विसर्जन स्थळांना नागरिकांचा अतिशय उतम प्रतिसाद लाभला. या कृत्रिम तलावात २४९९ घरगुती आणि १२ सार्वजनिक अशा दीड दिवसाच्या एकूण २५११ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये बेलापूर विभागातील १६ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ३२१ घरगुती आणि ४ सार्वजनिक, नेरुळ विभागात २४ विसर्जन स्थळांवर ३६१ घरगुती, वाशी विभागातील १६ विसर्जन स्थळांवर ३९९ घरगुती, तुर्भे विभागात १७  विसर्जन स्थळांवर ३८१ घरगुती आणि ६ सार्वजनिक, कोपरखैरणे मधील १५ विसर्जन स्थळांवर ३८५ घरगुती, घणसोली विभागात १८ विसर्जन स्थळांवर २०६ घरगुती, ऐरोली विभागात १६ विसर्जन स्थळांवर ३५७ घरगुती आणि २ सार्वजनिक तसेच दिघा विभागातील ९ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ८९ घरगुती अशाप्रकारे २४९९ घरगुती आणि १२ सार्वजनिक अशा दीड दिवसाच्या एकूण २५११ श्रीगणेशमुर्तींना निरोप देत विसर्जन करण्यात आले.


अशाप्रकारे दीड दिवसांच्या विसर्जन प्रसंगी ९०५४ घरगुती आणि २३ सार्वजनिक अशा एकूण ९०७७ श्रीगणेश मुर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली नाल्यातील दूषित पाण्याची प्रदूषण मंडळ द्वारे दखल